उमरखेड (Yawatmal) :- तालुका काँग्रेस (Congress) कमिटीच्या वतीने तालुकास्तरावर पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी नगरपालिका , जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणुकीची तयारी करण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन राजस्थानी भवन येथे १९ जून रोजी केले होते.
सरकारच्या विरोधात लढण्यासाठी आपल्याला दुप्पट तिप्पट ताकद लावावी लागेल
या कार्यक्रमाला माजी शिक्षण मंत्री (Former Minister of Education) प्रा. वसंत पुरके यांनी अध्यक्षीय भाषणातून बोलताना सांगितले. लाखो लोक पक्ष सोडून गेले तरी चालेल पण एक सच्चा कार्यकर्ता पक्षात असला पाहिजे कार्यकर्ता निष्क्रिय असला तरी चालेल पण तो इमानदार असला पाहिजे. या सरकारच्या विरोधात लढण्यासाठी आपल्याला दुप्पट तिप्पट ताकद लावावी लागेल तसेच पुढे बोलताना मला कोणत्याही पक्षाची भीती वाटत नाही पक्षांमध्ये नवीन मुलांना संधी द्या ५० टक्के नवीन तर ५० टक्के जुने असे नियोजन करून उमेदवारी द्या. स्थानिक नेत्यांनी वरवरची पेरणी करू नये असा मोलाचा सल्ला आपल्या भाषणातून दिला.
लोकसभा, विधानसभा, स्थानिक सहकारी सोसायटी च्या निवडणुकीत आम्ही हारलो असेल पण आमच्या विचारात बदल झाला नाही
कार्यक्रमाला कॉग्रेसचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आ. बाळासाहेब मांगुळकर, माजी आ.वजाहत मिर्झा, प्रदेश सचिव तातू देशमुख, प्रदेश महासचिव राजीव गांधी पंचायत राज समिती साहेबराव कांबळे, जफर खान, दत्तराव शिंदे, नंदकिशोर अग्रवाल, बाळासाहेब चंद्रे, शैलेश कोपरकर, गोपाल अग्रवाल, राम देवसरकर, वाशीफ पठाण, आत्माराम शिंदे, कविता पोपुलवाड, सुजाता सावंत, सूर्यकांता डिंडाळकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आदिवासी आघाडी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले जिल्हा परिषद, नगर परिषद व नगरपंचायत ची निवडणूक ही साधी निवडणूक नसून त्याला हलक्यावर घेऊ नये कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे पक्ष बळकट करण्यासाठी आम्ही नेहमी स्थानिक काँग्रेस कमिटीच्या सोबत असल्याचेही सांगितले
याप्रसंगी माजी गृहमंत्री माणिकराव ठाकरे यांनी बोलताना कार्यकर्त्यांनी नेहमी आपापल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवावे लागेल त्यांना विश्वासात घ्यावं लागेल तरच पक्ष बळकट होईल. मागे झालेल्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक सहकारी सोसायटी च्या निवडणुकीत आम्ही हारलो असेल पण आमच्या विचारात बदल झाला नाही.
उमरखेड महागाव मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित
काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा तळागाळातील विचार करणारा पक्ष आहे व पुढे बोलताना ग्रामीण भागात ५६ टक्के युवक बेरोजगार तर शहरी भागात ५० टक्के युवकांच्या हाताला काम नसल्याचेही आकडेवारी वाचून दाखवली व सत्ताधार्यांवर हल्लाबोल केला. या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी कार्यकर्त्यांना बोलताना सांगितले. संपूर्ण तालुका हा काँग्रेसमय आहे. उमरखेडमध्ये नगरपरिषद ने विधानसभेत नेहमी लीड दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत आम्ही ताकतीने लढू व जिंकून दाखवू असे आश्वासन दिले. आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी बोलताना ज्यांनी पक्षात राहून बंडखोरी केली. त्यांच्यावर हल्लाबोल करा तसेच त्यांच्या पाठीवर लाथ मारून पक्षातून हकालपट्टी करा असे म्हणाले. या काँग्रेस कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे यांनी केले. तर संचालन सिद्धेश्वर जगताप यांनी केले तर आभार शिवाजीराव वानखेडे यांनी केले. यावेळी उमरखेड महागाव मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते.