हिंगोली (Eye check-up camp) : महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोली येथील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय येथे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रनायक नानासाहेब मोखडे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी होमगार्ड महिला पुरुष व त्यांच्या कुटुंबीयांची नेत्र तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोली येथील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाच्या वतीने जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रनायक नानासाहेब मोखडे यांच्या अध्यक्षतेखाली १३ डिसेंबरपासून सप्ताहास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी होमगार्ड यांच्यासाठी ‘आहार विहार’ या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. तर 14 डिसेंबर रोजी शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदान व नवीन पोलीस वसाहत येथे (Eye check-up camp) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
15 डिसेंबर रोजी जिल्हा समादेशक कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 16 डिसेंबर रोजी संचलन व कवायत सराव घेण्यात आली. मंगळवार 17 डिसेंबर रोजी होमगार्ड महिला पुरुष व त्यांच्या कुटुंबीयांची मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. (Eye check-up camp) नेत्र तपासणी शिबिराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रनायक नानासाहेब मोखडे तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे नरेंद्र पाडाळकर व हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांची उपस्थिती होती. नेत्र तपासणी शिबिराचा दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. नेत्र तपासणीचे काम प्रीतम सरकटे सेवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ पलट नायक हरिशंकर जोशी, भागवत देवरसे, पलट नायक सुनील मुनेश्वर, शंकर कांद्रे, शंकर कंठे, वामन मगर, विश्वनाथ बेंद्रे आदींनी परिश्रम घेतले.
उद्या प्रभात फेरी –
महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 18 डिसेंबर रोजी जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाच्या परिसरातून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. तर 19 डिसेंबर रोजी समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.