‘भारत गौरव’ रेल्वे यात्रा – ९ जूनपासून
गडचिरोली (Chhatrapati Shivaji Maharaj) : भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ही विशेष भारत गौरव पर्यटक ट्रेन दिनांक ९ जून २०२५ पासून सुरु होत आहे. या पाच दिवसांच्या खास दौर्यात महाराजांच्या ऐतिहासिक स्थळांचा समावेश करण्यात आला असून इतिहासप्रेमींनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
ही पर्यटक ट्रेन (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , दादर आणि ठाणे येथून प्रवास सुरू करेल. दौर्याची रूपरेषा मुंबई, रायगड किल्ला, पुणे, शिवनेरी किल्ला, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, प्रतापगड, कोल्हापूर, पन्हाळा किल्ला आणि पुन्हा मुंबई अशी आहे.
रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक आणि राजधानीचा किल्ला.,पुणे – लाल महाल, कासबा गणपती आणि ‘शिवसृष्टी’ या प्रकल्पाची सफर,शिवनेरी किल्ला – महाराजांचा जन्मस्थळ,भीमाशंकर – ज्योतिर्लिंग दर्शन,प्रतापगड – अफझल खानावर विजय आणि तुलजाभवानी मंदिर,कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर आणिपन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडेंच्या शौर्याचा साक्षीदार आदी ठिकाणी भेट देता येणार आहे.
दौर्याचा कालावधी : ५ दिवस (६ व्या दिवशी पहाटे समारोप) दिनांक : ९ जून २०२५ ते १४ जून २०२५ असा राहणार आहे. प्रवासासाठीस्लीपर श्रेणी – १३,१५५ रूपये, ३Aण् – ?१९,८४० आणि २Aण् – २७,३६५ रूपये आहे.प्रवासात निवास, शाकाहारी भोजन, स्थानिक प्रवासासाठी बस, स्मारक प्रवेश शुल्क, रायगड रोपवे शुल्क, प्रवासी विमा आदी सुविधा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी इतिहासाशी जोडलेल्या स्मारकांची सफर घडवण्यात येणार असून शाळा, कॉलेज, सांस्कृतिक संस्था व इतिहासप्रेमींसाठी ही संधी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
जिल्ह्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी पंडा
ही टूर ‘भारत गौरव ट्रेन’ या उपक्रमांतर्गत (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांना समर्पित असून महाराजांचा शौर्यगाथा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी एक अभिनव पाऊल आहे. अधिक माहितीसाठी आणि आरक्षणासाठी आयआरसीटीसी च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पंडा यांनी केले आहे.




 
			 
		

