रिसोड तालुक्यातील कवठा येथील घटना
रिसोड (Farm laborer Death) : दिनांक 3 एप्रिल रोजी रिसोड शहर सह तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळी वारा विजेच्या गडगडासह अवकाळी पावसाने अक्षरशा झोडपून काढले. यामुळे विशेषता शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. यातच रिसोड तालुक्यातील कवठा येथे तीन एप्रिल रोजी दुपारी चार वाजता शेतात हळद उकळण्याचे काम करत असताना वीज पडून एका (Farm laborer Death) शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
चंद्रविलास काठोळे वय 40 वर्षे रा.कवठा असे (Farm laborer Death) शेतमजुराचे नाव असून हळद उकळताना दरम्यान पाऊस सुरू झाल्याने तो शेतातच बाजूला उभा राहिला. यादरम्यान त्याच्या अंगावर विज पडली आजूबाजूचे शेतकरी व हळद उकडणाऱ्या अन्य मजुरांनी त्यास वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले




