सावळी सदोबा (Yawatmal) :- आर्णी तालुक्यातील माळेगांव येशील शेतकर्यांने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाच्या मानसिक तणावाला (Mental stress) कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली
मृतक शेतकर्याचे नाव गुलाब उमला राठोड (५५) असून शेतकर्याकडे चार एकर स्वतःच्या मालकीची शेती (Farmer) असून, शेतकर्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज आहे. सकाळी घरातील सर्व सदस्य शेतातील कामासाठी शेतात गेले असता, समोर पेरणीचे दिवस येत आहे. बियाण्यासाठी पैसे लागतात, शेतकर्यांने या विचाराने घरातच गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. गुलाब राठोड हे अलिकडच्या काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे आर्थिक संकटात सापडले होते. त्यांच्या शेतात पावसाअभावी अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ते अत्यंत चिंतेत असल्याने त्यांनी शेवटी आपल्या घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल आणि दोन मुली असा परिवार आहे.



 
			 
		

