हिंगोली (Farmer Committed Suicide) : सेनगाव तालुक्यातील भगवती येथील २२ वर्षीय तरूण शेतकर्याने दिड लाख रुपयाच्या कर्जामुळे गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. या प्रकरणी गोरेगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.
याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील भगवती येथील गोपाल सिताराम जाधव (२२) याच्याकडे भगवती शिवारात गट क्र ८५,२२६,२१४, ६९ यामध्ये साडेपाच एक्कर शेती असुन त्याने गोरेगाव येथील भारतीय स्टेट बँकेकडून सन २०२१ मध्ये दिड लाख रुपयाचे पिककर्ज घेतले होते. (Farmer Committed Suicide) पिककर्ज घेतल्यानंतर सदर रक्कम पेरणीसाठी वापरण्यात आली.
परंतु सतत झालेल्या नापिकीमुळे हे कर्ज फेडता आले नाही. यावर्षी चांगले पिक असताना मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडचा घास गेला. त्यातच सप्टेंबर महिन्यातही अतिवृष्टीने होते नव्हते ते पिकही वाहून गेले. त्यामुळे मागील काही दिवसापासून ते चिंतेत होते. २ ऑक्टोंबर रोजी गोपाल जाधव हे नेहमी प्रमाणे जेवन करून घराबाहेर पडले. परंतु ३ ऑक्टोंबर रोजी सकाळपर्यंत ते घरी आले नसल्याने कुटूंबीयांनी अनेक ठिकाणी त्यांचा शोध घेतला. याचवेळी गोपाल जाधव यांचा (Farmer Committed Suicide) मृतदेह ज्ञानबा रामजी जाधव यांच्या शेत गट क्र. ८७ मध्ये शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाल्यानंतर जमादार राहुल मैदकर, अनिल भारती, रवि सावळे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात रामेश्वर जाधव यांनी दिलेल्या माहिती वरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. पुढील तपास राहुल मैदकर हे करीत आहेत.