परभणीतील जिंतूर तालुक्यातील घटना नापिकी,कर्जाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल…!
परभणी (Farmer suicide) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ४५ वर्षीय शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार २ २ ऑगस्ट रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील देगाव धानोरा येथे उघडकीस आली. या (Farmer suicide) प्रकरणी बोरी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
भागोजी दत्तराव इप्पर वय ४५ वर्ष, असे मयत शेतकर्याचे नाव आहे. जगदीश इप्पर यांनी या बाबत खबर दिली आहे. शेतातील सततची नापिकी आणि बँकेचे झालेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत भागोजी इप्पर यांनी घरातील माळवदाच्या लोखंडी कडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन (Farmer suicide) आत्महत्या केली. घटनेची माहिती बोरी पोलिसांना देण्यात आली. प्रकरणाचा तपास पोह. कंठाळे करत आहेत.
मद्यपी अवस्थेत घेतला गळफास
परभणी : मद्यपी अवस्थेत घरातील पत्राच्या लोखंडी आडूला साडीने गळफास लावून २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या (Farmer suicide) केली. ही घटना २२ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथे घडली. लक्ष्मण कुरधणे यांनी खबर दिली आहे. प्रविण अच्युत कुरधणे, असे मयताचे नाव आहे. तपास पोह. जाधव करत आहेत.