आमदार राजेश विटेकर यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे
पिकविमा प्रश्नी ७ मे रोजी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
परभणी/पाथरी (Farmers Andolan) : खरीप हंगाम २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप थकीत पीकविमा रक्कम न मिळाल्याने संतप्त झालेल्या (Farmers Andolan) शेतकऱ्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सोमवार, २८ एप्रिलपासून पाथरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.
परभणी जिल्ह्यातील तब्बल ५ लाख ५६ हजार ७६० तक्रारींपैकी केवळ ४९ हजार शेतकऱ्यांना १०२ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांना फक्त २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात आली. शासनाच्या नियमानुसार २० टक्के शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होताच सर्वांना विमा मंजूर करणे आवश्यक असताना विमा कंपनीने मनमानी केली असल्याचा आरोप (Farmers Andolan) आंदोलक शेतकऱ्यांनी केला.
यातच बाभळगाव महसूल मंडळाची वगळण्याची बाबही (Farmers Andolan) आंदोलकांनी अधोरेखित केली. या पार्श्वभूमीवर मंगळवार, २९ एप्रिल रोजी पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी यावेळी विमा वाटपात दुजाभाव झाल्याचे आरोप करत संपूर्ण विमा मंजुरीची मागणी लावून धरली.
आमदार विटेकर यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी थेट संपर्क साधत, आंदोलक शेतकरी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात ७ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्याची हमी मिळवली. त्यानंतर (Farmers Andolan) आंदोलकांनी आमदारांच्या विनंतीवरून उपोषण मागे घेतले.
या वेळी नवनाथ कोल्हे, मुंजाभाऊ कोल्हे, शिवाजीराव कदम आदी उपोषणकर्त्यांना आमदार विटेकर यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन उपोषण समाप्त करण्यात आले. तहसीलदार शंकर हांदेश्वर, बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते, माजी जि.प . सभापती दादासाहेब टेंगसे , बाजार समितीचे माजी सभापती माधवराव जोगदंड, बाळासाहेब कोल्हे, अजिंक्य नखाते, गजानन धर्मे , उपसरपंच ,संतोष कोल्हे सरपंच बंटी पाटील , निरज नाईक आदींची उपस्थिती यावेळी होती. शेतकरी आणि प्रशासन यांच्यात आमदार राजेश विटेकर यांच्या मध्यस्थीमुळे समाधानकारक तोडगा निघाला असून, ७ मे रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.




