बाजारात शेतकऱ्यांची वर्दळ दिसेना
खतांचा 74 हजार 241 मेट्रिक टन साठा शिल्लक
खतांचा 74 हजार 241 मेट्रिक टन साठा शिल्लक
अरुण हांडे
लातूर (Seeds and fertilizer) : मृग नक्षत्राचा सूर्य उगवायला आला तरी लातूरच्या बाजारात खते व बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची वर्दळ अद्याप दिसून येत नाही. अवकाळी पाऊस कितीही पडला तरी शेतकऱ्यांचा भरोसा मृग नक्षत्रावरच असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. दरम्यान मृग नक्षत्रात किमान 80 मिमी पाऊस झाल्यासच पेरते व्हा, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. (Seeds and fertilizer) खरीप हंगाम पेरणीसाठी लातूरच्या बाजारात विविध खतांचा 74 हजार 241 मेट्रिक टन साठा शिल्लक असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.
यंदा कृतिका नक्षत्रापासूनच लातूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. हा अवकाळी पाऊस मानला गेला असला तरी आत्तापर्यंत जवळपास 240 मिमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. पावसाचा हा ऐतिहासिक विक्रम मानला जात आहे. असे असले तरी हा पाऊस मृग नक्षत्राच्या अगोदरचा असल्याने या पावसावर शेतकरी भरोसा ठेवत नाही. त्यामुळेच उद्या शनिवारपासून मृग नक्षत्राला सुरुवात होत असली तरी लातूरच्या बाजारात शेतकरी गर्दी करताना दिसत नाही. बाजारामध्ये (Seeds and fertilizer) बी बियाणे खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, असा दावा कृषी खात्याने केला आहे.
खत आणि बियाण्यांच्या (Seeds and fertilizer) उपलब्धतेबाबत अधीक्षक कृषी अधिकारी लाडके यांनी सांगितले की, महाबीजच्या बियाण्यांचा एकूण साठा 24 हजार 790 क्विंटल एवढा उपलब्ध असून खाजगी बियाण्यांचा साठा 1 लाख 84 हजार क्विंटल शिल्लक आहे. तर युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी खतांचा एकत्र साठा 99 हजार 241 मे. टन उपलब्ध होतो. त्यापैकी 25 हजार मे. टन विक्री झाला असून 74 हजार 241 मे. टन साठा शिल्लक आहे.
उगवण क्षमता तपासूनच बियाणे पेरा…
मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असला तरी शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात 80 ते 100 मि.मी. पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नये, असे सांगीतले आहे. सोबतच सोयाबीन पेरणीसाठी घरचे सुस्थितीतील, पावसात न भिजलेले बियाणे वापरावे आणि त्याची उगवण क्षमता तपासून बीज प्रक्रिया करुन घ्यावी, अशा सूचना प्रशासनाने शेतकऱ्यांना केल्या आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके (Seeds and fertilizer) अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत आणि पक्की पावती जपून ठेवावी. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अकरा भरारी पथके…
बोगस बियाणे, खते विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात ११ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. कृषी निविष्ठांबाबत तक्रारी असल्यास तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती किंवा टोल-फ्री क्रमांक 1800 233 4000 वर संपर्क साधावा. (Seeds and fertilizer) बोगस बियाणे विक्री, खतांचा काळाबाजार किंवा लिंकिंग करणाऱ्या कंपन्या आणि कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधीक्षक कृषी अधिकारी लाडके यांनी सांगितले.
पेरणीपूर्व मशागतीची कामे संपताच गर्दी वाढेल!
मान्सून पूर्व पाऊस भरपूर झाला असला तरी शेतकऱ्याच्या पेरणीपूर्व मशागतीचे कामे या पावसामुळे खोळंबली होती. दोन दिवसांपासून आता पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. मृग नक्षत्रातील पावसानंतर शेतकरी (Seeds and fertilizer) खरिपाच्या पेरणीचे धाडस करतो. शेती मशागतीची कामे संपताच बाजारात शेतकऱ्यांची गर्दी वाढेल, अशी अपेक्षा आम्हाला आहे. यंदा आमच्या मागणीप्रमाणे बी बियाणे व खतांचा पुरवठा झाला आहे.
– नेताजी रणखांब, क्रांती कृषी सेवा केंद्र, लातूर