मानोरा (Manora) :- आर्थिक गणित बिघडलेले आहे. शेतीसाठी घेतलेले पीक कर्ज भरणे कठीण झाले आहे. विधानसभा निवडणूकीत (Assembly elections) लोक सभेची पुनरावृती होऊ नये म्हणून सत्ताधारी पक्षाने निवडणूकीत जाहीरनाम्यात अनेक प्रलोभने दिलीत. त्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे नमूद होते.
मानोरा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना तीन प्रतीत अर्ज भरावे लागणार
निवडणूक प्रचार सभेमध्ये कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करु असे आश्वासन शेतकऱ्यांना दिल्या गेले होते, त्यामुळे विश्वास करून शेतकऱ्यांनी फडणवीस सरकार सत्तेत आणले, मात्र शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा सरकारला विसर पडला आहे. शेतकरी नेते किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते प्रकाश पोहरे यांनी शासनास कर्ज माफी देण्यास भाग पाडू वेळ पडल्यास कोर्टात जनहीत याचीका दाखल करु असे रणशिंग फुंकले आहे. त्यासाठी रयतेचे राजे छत्रपती संभाजी महाराज यांचे जयंती दिनी येत्या १४ मे रोजी तहसील कार्यालयात कर्जमाफीचे अर्ज सादर करण्याचे ठरले आहे. कर्जमाफीचे अर्ज देशोन्नती कार्यालय, तालूका प्रतीनिधी तसेच किसान ब्रिगेड अध्यक्ष यांच्याकडून कडून प्रती अर्ज १० रुपये प्रमाणे मिळतील. तरी राज्यासह वाशीम जिल्हा व मानोरा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना तीन प्रतीत अर्ज भरावे लागणार आहे. तरी शेतकऱ्यांनी अर्ज प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



 
			 
		

