सरकारचे विरोधात जोरदार निदर्शने
चांदूरबाजार (Farmers Violent protest) : शेतकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाने पुन्हा एकदा शासनाला झोपेतून उठवणारे आंदोलन उभारले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी “ताटवाटी आंदोलन” करून शासनाने दिलेले अपमानास्पद १७५० रुपयांचे अनुदान काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परत केले.हे आंदोलन प्रहार तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ बंड व दिनेश आमझरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी व महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडले. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध तीव्र घोषणाबाजी करून प्रचंड संताप व्यक्त केला.
जून ते सप्टेंबर २०२५ या काळात अतिवृष्टी, धुके आणि महापूरामुळे शेतकऱ्यांचे १००% पीक नष्ट झाले. एक एकर शेतीसाठी ५० हजारांपेक्षा अधिक खर्च करूनही हातात आलेले फक्त १७५० रुपये हे शेतकऱ्याच्या आयुष्याशी केलेले टवाळखोर धोरण असल्याचा आरोप (Farmers Violent protest) आंदोलनकर्त्यांनी केला. पंजाब सरकारने ओल्या दुष्काळात प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत तत्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंना दिलासा दिला. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही मदत जाहीर करावी, अन्यथा हा आक्रोश रस्त्यावर उतरेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
या (Farmers Violent protest) आंदोलनात शासनाकडून मिळालेले १७५० रुपयांचे अपमानास्पद अनुदान परत करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये गजानन रामराव खुळे, माधवराव धोंडे, अनिलभाऊ खैरखार, प्रदीप खुळे, रमेश्वर पोहोकार, गजानन ठाकरे, मदन राऊत, साहेबराव घोरमाडे, मोहन बोरवार, अरुण भुले, घनश्याम घोम, नाजुकराव नवले, बंडूभाऊ धरपाल, संदीप मोहोड, राहुल सायरे, गजानन भेटाळू, संतोष ठाकरे, ऋषी पोहोकार, आशिष बंड, रितेश बंड, प्रज्वल भोकसे यांचा समावेश आहे.याचबरोबर महिला कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. वर्ष ढाले, स्वाती बलंगे, गीतांजली नाकडे, स्टेला मॅडम, गीतांजली वाटाणे, मेघा काळे, राखी तायडे यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठाम भूमिका घेत शासनाविरोधात आवाज बुलंद केला.
आंदोलनादरम्यान (Farmers Violent protest) प्रहार कार्यकर्त्यांनी शासनावर तीव्र शब्दांत टीका केली. “शेतकरी भूक, कर्ज, नैराश्य आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. तरीही हिंदुत्वाचा गाजावाजा करणारे सरकार शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहत नाही. जर अशा अपमानजनक मदतीचे तुकडे फेकले जात राहिले, तर उद्रेक अटळ आहे आणि त्याला जबाबदार फक्त व फक्त हे बधीर सरकार असेल!” असा इशारा त्यांनी दिला. चांदूरबाजारातील हे ताटवाटी आंदोलन प्रहारच्या नेतृत्वाखाली यशस्वी ठरले. शेकडो शेतकरी व महिलांनी सहभाग घेऊन शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण केले.