शेतकऱ्याचा शेतीमाल हा शेतकऱ्याकडूनच खरेदी करण्याचा उपक्रम!
हिंगोली (Farmers) : दरवर्षी दिवाळीतील लक्ष्मीपुजनाला ‘शेतमालाची योग्य किंमतीला खरेदी करुन शेतमालाचा सन्मान करण्याकरिता हे अभियान राबविल्या आले. शेतक-याच्या सुशिक्षित उच्चपदस्थ मुले हे एकत्र येऊन हे अभियान महाराष्ट्रभर राबवून शेतकऱ्याकडूनच शेतमाल खरेदी करत सन्मान राखला आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्याच्या शेतमालाला किंमत द्या, भीक नको!
हिंगोली येथील शेतकऱ्याच्या उच्च पदस्थ मुलांनी शेतकऱ्याचा शेतीमाल हा शेतकऱ्याकडूनच खरेदी करण्याचा उपक्रम 21 ऑक्टोबर रोजी राबविण्यात आला. जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत (Market) शेतकऱ्याच्या उच्चपदस्थ मुलांनी शेतकऱ्याकडील शेतीमाल खरेदी शेतकऱ्याकडुनच करणे,शेतमाल खरेदी करतांना भाव न करणे, कमी किंमत असेल तर जास्त किंमतीला शेतमाल खरेदी करणे, गोरगरीब कारागीरांनकडुन वस्तु खरेदी करणे. वर्ष भर वरिल कृतिचे अनुकरण करणे हे अभियान आज 21 ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजता राबविण्यात आले. आणि बाजारपेठेतील पूरग्रस्त शेतकऱ्याच्या शेतमालाला किंमत द्या,भीक नको घामाला दाम द्या असा मूलमंत्र घेऊन आम्ही सर्व शेतकऱ्यांची सुशिक्षित मुले या अभियानाखाली राबवून शेतकऱ्याकडूनच शेतीमाल (Agricultural Goods) व इतर साहित्य खरेदी करण्याचा चंग बांधल्याने थोडीफार शेतकऱ्यांनाही मदत या दीपावलीच्या सणात होईल या दृष्टिकोनातून उपक्रम राबविल्याने सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.