हिंगोली (Jodatala Farmer Suicides) : तालुक्यातील जोडतळा येथील ३३ वर्षीय शेतकर्याने दुष्काळी परिस्थितीच्या चिंतेतून १५ सप्टेंबरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने बासंबा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.
हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथील राजेश सुर्यभान जाधव (३३) या शेतकर्याने मागील एक महिन्यापासून पाऊस पडला नसल्याने तसेच कोरड्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली व शेतातील सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याने आपल्या मुलांना काय खायला द्यावे व सततच्या दुष्काळी परिस्थितीने चिंतेतून १५ सप्टेंबर रोजी गावातील अनिल प्रकाश कावरखे यांच्या शेतात जाऊन सागवानाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Jodatala Farmer Suicides) केली. या प्रकरणी १८ सप्टेंबरला बासंबा पोलिसात वैशाली जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि विकास आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोले हे करीत आहेत.
कोरड्या दुष्काळाच्या परिस्थितीने शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या
Jodatala Farmer Suicides: जोडतळा येथील ३३ वर्षीय शेतकर्याने दुष्काळी परिस्थितीच्या चिंतेतून १५ सप्टेंबरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने बासंबा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद
Jodatala Farmer Suicides
संबंधित सामग्री
परभणीत कर्जबाजारीपणातून सारंगापूर येथील शेतकर्याची आत्महत्या
Parbhani Farmer suicides: तालुक्यातील सारंगापूर येथे कर्जाच्या तणावातून ५५ वर्षीय शेतकर्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवार २७ सप्टेंबर रोजी रात्री घडली. बन्सी आश्रोबा चौखट
परभणीतील मिरखेल येथील शेतकर्याची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Parbhani Farmer suicides: पावसाअभावी खरीप हंगामातील पिके हातची गेली आहेत. जुन महिन्यात शेतकर्यांनी कर्जबाजारी होऊन खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. परंतु पेरणीसाठी लागलेला खर्च देखील निघणार नाही...
हिंगोली विकासात गडचिरोलीपेक्षाही मागे - अंबादास दानवे
हिंगोली विकासात गडचिरोलीपेक्षाही मागे असल्याचा दावा अंबादास दानवेंनी केला. प्रलंबित विकासकामे, सिंचन आणि शेतकरी आत्महत्यांवरून सरकारवर टीका केली.
परभणीत नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या...!
Parbhani Farmer Suicides: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकर्याने विषारी द्रव प्राशन केले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता शेतकर्याचा मृत्यू झाला.
शेतातील नापिकीमुळे आणखी एक शेतकऱ्याची आत्महत्या
Farmer Suicides: कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील शेतकऱ्याने शेतातील नापिकीमुळे व कर्ज कसे फेडावे या चिंतेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.