हिंगोली बाजार समिती

हिंगोलीच्या मोंढ्यात १३ हजार  ९०० रुपयाचा भाव

Hingoli Bazar Samiti: हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ११ दिवसाच्या सुट्टीनंतर बाजार सुरु झाल्यावर हळदीला १३ हजार ९०० रुपयाचा भाव मिळाला, ज्यामुळे उत्पादकांमध्ये समाधान दिसून आले.

हिंगोलीच्या मोंढ्यात १३ हजार  ९०० रुपयाचा भाव

Hingoli Bazar Samiti

११ दिवसाच्या  सुट्टीनंतर मोंढा झाला सुरु

हिंगोली (Hingoli Bazar Samiti) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २६ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत शासकीय सुट्ट्या, नाणेटंचाई व मार्च एन्डचे लेखे पुर्ण  करण्यासाठी शेतीमालाचे लिलाव बंद होते. त्यानंतर  ६ एप्रिल सोमवार रोजी बाजार  समिती सुरु झाल्याने  येथे हळदीची २ हजार  २५० क्विंटल आवक  झाली  होती. हळदीला १३ हजार  ९०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला. येथील बाजार समितीत (Hingoli Bazar Samiti) सलग ११ दिवस बंद असल्याने सोमवारी सुट्ट्या संपल्यावर  ती सुरु झाली. पहिल्याच दिवशी हळदीची  मोठ्या  प्रमाणावर आवक झाली  होती. २ हजार २५० क्विंटल हळद  विक्रीसाठी आली होती. हळदीला १३ हजार ९०० रुपयाचा भाव मिळाल्याने हळद  उत्पादकातून समाधान दिसून आले.

 मार्च महिन्यात  १७ तारखेला हळदीला १२ हजार ९५० रुपयाचा  भाव  मिळाला होता.  त्यानंतर पुढील काही दिवस हळदीचा लिलाव  झाला  नव्हता. नंतर सुट्ट्या आल्याने  बाजार  समितीमध्ये शेतमालाचे सर्वच लिलाव बंद ठेवण्यात आले  होते. सोमवार (Hingoli Bazar Samiti) बाजार समिती सुरु होण्यापूर्वीच एक दिवस अगोदरच शेतकर्‍यांनी  शेत माल विक्रीसाठी  आणला होता. यामध्ये तुर, सोयाबीन, हरभरा हा शेतमाल देखील विक्रीसाठी  आला  होता. यात सर्वाधिक हळदीची आवक झाली होती. मार्च महिन्यात  हळदीला  मिळालेल्या भावापेक्षा  भावात  थोडी वाढ झाल्याने हळद  उत्पादकातून समाधान मानले जात आहे. मात्र हळद  उत्पादकांना १५ हजाराच्या  वर हळदीला भाव मिळण्याची अपेक्षा अद्यापही कायम असल्याचे हळद उत्पादक  सांगत आहेत.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026