हिंगोली हळद मार्केट

हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये शेतकर्‍यांच्या मालाचे नुकसान

Hingoli Turmeric Market: हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या हजारो क्विंटल हळदीचे नुकसान झाले. शेतकरी आर्थिक ताणात.

हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये शेतकर्‍यांच्या मालाचे नुकसान

Hingoli Turmeric Market


हिंगोली (Hingoli Turmeric Market) : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी वातावरणात अचानक बदल होऊन वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत उष्ण आणि दमट असलेल्या हवामानाने अवघ्या काही मिनिटांत रौद्र रूप धारण केले. जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. 

या अचानक आलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संत नामदेव हळद मार्केटला बसला. (Hingoli Turmeric Market) बाजार समितीत विक्रीसाठी आपला माल घेऊन आलेल्या शेतकर्‍यांची मोठी तारांबळ उडाली. सकाळपासूनच हळद विक्रीसाठी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी दाखल झाले होते. हजारो क्विंटल हळद उघड्यावर पडून होती. अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकर्‍यांना आपली हळद झाकण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणात हळद भिजल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भिजलेल्या हळदीचा रंग आणि प्रतवारी खालावल्याने बाजारभाव मिळणे कठीण होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

काही शेतकर्‍यांनी ताडपत्री आणि प्लास्टिकच्या साहाय्याने हळद वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र वार्‍याच्या वेगापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. दरम्यान, हवामान विभागाने याआधीच जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, पावसाची तीव्रता इतकी असेल याची कल्पना शेतकर्‍यांना नव्हती. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. या पावसामुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026