महाराष्ट्र दुहेरी दुष्काळ

महाराष्ट्रावर हवामान बदलाचे सावट; दुहेरी दुष्काळाचे संकट 

Maharashtra Drought: काही तासांत मुसळधार पाऊस पडणे आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाचा खंड पडणे, हा नवा पॅटर्न महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत जाणवत आहे. हवामानबदलामुळे वातावरणाची आर्द्रता धारण...

महाराष्ट्रावर हवामान बदलाचे सावट; दुहेरी दुष्काळाचे संकट 

Maharashtra Drought

पावसाचे बदलते चक्र; काही तासांत अतिवृष्टी, तर आठवड्यांचे कोरडे दिवस

दीपक पं देशमुख
अकोला () :
भारतीय मान्सूनच्या स्वरूपात गेल्या काही दशकांत लक्षणीय बदल होत असून, एकूण पावसाचे प्रमाण कायम राहिले तरी त्याचे दिवस, वेळ, तीव्रता आणि भौगोलिक वितरण बदलत आहे. काही तासांत मुसळधार पाऊस पडणे आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाचा खंड पडणे, हा नवा पॅटर्न महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत जाणवत आहे. हवामानबदलामुळे वातावरणाची आर्द्रता धारण करण्याची क्षमता वाढत असल्याने कमी कालावधीत (Maharashtra Drought) अधिक तीव्र पाऊस पडण्याची शक्यता वाढते. परिणामी एकाच हंगामात काही भागांत पूर, तर काही भागांत पाणीटंचाई अशी विरोधाभासी परिस्थिती निर्माण होत असल्याने राज्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे.

महाराष्ट्रातील यंदाची पर्जन्यस्थिती या (Maharashtra Drought) बदलाचे ठळक उदाहरण ठरत आहे. २४ ऑगस्टपर्यंतच्या उपलब्ध विभागनिहाय आकडेवारीनुसार, जून-जुलैमध्ये राज्यात सरासरीपेक्षा ४.३ टक्के अधिक पाऊस झाला; मात्र ऑगस्टमध्ये राज्याची पर्जन्यमानाची स्थिती केवळ ५२.७ टक्के सरासरी इतकी राहिली. त्यामुळे हंगामाच्या एकूण पावसाची तूट १०.७ टक्क्यांवर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात विभागनिहाय मोठी तफावत

कोकण विभागात जूनपासून २5 ऑगस्टपर्यंत २३४०.८ मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या १००.९ टक्के आहे. मात्र नाशिक विभागात ४०८.२ मिमी म्हणजे ७९.९ टक्के, पुणे विभागात ५६९.८ मिमी म्हणजे ७९.४ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ३६७.५ मिमी म्हणजे ७८.२ टक्के, अमरावती विभागात ४४८.९ मिमी म्हणजे ७९.२ टक्के, तर नागपूर विभागात ५८८.४ मिमी म्हणजे ७१.९ टक्के पाऊस झाला आहे.

शेती, पाणी आणि शहरांसमोर नवे आव्हान

पावसाच्या या (Maharashtra Drought) अनियमिततेचा सर्वाधिक फटका शेतीला बसतो. पेरणीनंतर पावसाचा मोठा खंड पडल्यास पिकांची वाढ खुंटते; तर अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे मातीची धूप, पिकांचे नुकसान आणि जलमय स्थिती निर्माण होते. मराठवाड्यात ऑगस्टमधील दीर्घ कोरड्या कालावधीमुळे जलसाठे आणि खरीप पिकांबाबत चिंता वाढली आहे.

कधी, कुठे आणि किती तीव्रतेचा
हवामानबदलासोबत हिंदी महासागराचे वाढते तापमान, एल निनो-ला नीना यांसारख्या महासागरीय घटना आणि वातावरणातील बदलता प्रवाह मान्सून अधिक गुंतागुंतीचा बनवत आहेत. त्यामुळे भविष्यात ‘सरासरी पाऊस’ हा एकटाच पुरेसा मापदंड राहणार नाही; पाऊस कधी, कुठे आणि किती तीव्रतेने पडतो, हे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित सामग्री

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा, अनेक प्रकल्प आटण्याच्या मार्गावर

मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा, अनेक प्रकल्प आटण्याच्या मार्गावर

मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा शिल्लक. सिद्धेश्वर, सीना-कोळेगाव शून्यावर; जायकवाडी 77.08% तर मांजरा 10% वर.

Oct 02, 2026