शेतकरी बेमुदत उपोषण

शिवरस्ता अडीच वर्षांपासून बंद; सरणावर बसून शेतकऱ्याचे बेमुदत उपोषण

Farmers Hunger Strike: शेतकऱ्यांनी शेत कामांसाठी अडतील बांधलेल्या रस्त्याखाली वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता खुलाव्याच्या मागणीसाठी सरण बांधून उपोषण करीत आहेत.

शिवरस्ता अडीच वर्षांपासून बंद; सरणावर बसून शेतकऱ्याचे बेमुदत उपोषण

Farmers Hunger Strike

भूम (Farmers Hunger Strike) : भूम तालुक्यातील सामनगाव–गणेगाव येथील अडीच वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता तातडीने खुला करण्याच्या मागणीसाठी गणेगाव येथील शेतकरी धन्यकुमार नारायण चव्हाण यांनी मंगळवार (दि. ७) पासून संबंधित रस्त्यावरच सरण रचून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मुसळधार पावसातही सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसराचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले आहे.

उपोषणस्थळी लावण्यात आलेल्या बॅनरवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. उपोषणकर्ते धन्यकुमार चव्हाण यांनी याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या निवेदनानुसार, सामनगाव–गणेगाव परिसरातील संबंधित शिवरस्ता गेल्या अडीच वर्षांपासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगाम सुरू असताना पेरणीसह अन्य कृषी कामांवर त्याचा विपरीत परिणाम होत असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रस्ता खुला करण्यासाठी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. (Farmers Hunger Strike) अधिकृत मोजणीची प्रक्रिया देखील पूर्ण झाली. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्षात रस्ता मोकळा करण्याबाबत कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतीची कामे ठप्प झाली असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, सुरू असलेल्या पावसातही धन्यकुमार चव्हाण यांनी रस्त्यावरच सरण रचून बेमुदत उपोषण सुरू ठेवले आहे. उपोषण सुरू होऊन एक दिवस उलटूनही प्रशासनातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने आंदोलनस्थळी भेट दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शिवरस्ता तातडीने खुला करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. आता या आंदोलनावर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सामनगाव–गणेगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफीची रक्कम मिळूनही IOB एकलारा शाखेतील २८८ शेतकऱ्यांची खाती बंद नाहीत. नवीन पीक कर्जासाठी चार तास ठिय्या आंदोलनानंतर तातडीच्या कार्यवाहीचे आदेश.

Sep 26, 2026
शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

तावशीतील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तासन्‌तास उन्हात थांबले; भेट न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत करपलेल्या पिकांची होळी केली.

Sep 24, 2026
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषद; धान खरेदी, नुकसानभरपाई, महामार्ग व रोजगाराच्या मागण्या.

Sep 18, 2026
नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

धान बोनस, ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर आणि २४ तास वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात नागभीडमध्ये हजारो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा.

Sep 17, 2026
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दौऱ्यापूर्वी नामदेव पतंगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप; जिल्हाभर आंदोलनाचा इशारा.

Sep 16, 2026