Nagbhid Farmer Protest

नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

धान बोनस, ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर आणि २४ तास वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात नागभीडमध्ये हजारो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा.

नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

Nagbhid Farmer Protest

प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी सहभागी; धान बोनस, कर्जदार शेतकऱ्यांना २ लाखांची प्रोत्साहन रक्कम आणि २४ तास वीजपुरवठ्याची मागणी

नागभीड : धानाला बोनस आणि उत्पादनाला योग्य मोबदला मिळावा, या प्रमुख मागण्यांसह धान उत्पादक शेतकऱ्यांनी १७ सप्टेंबर रोजी नागभीडमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर मोर्चा काढला. शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो ट्रॅक्टरसह हजारो शेतकरी सहभागी झाले.

तळोधी (बा.) येथील साई मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा नागभीड तहसील कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला. ‘धानाला बोनस मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

दरम्यान, नागपूर-मुल-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहन रक्कम देण्यात यावी, धानाला किमान ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा आणि शेतीसाठी २४ तास सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय नवीन विद्युत कनेक्शन तातडीने देण्याची मागणीही करण्यात आली.

मोर्चादरम्यान शेतकऱ्यांकडून ‘धानाला बोनस मिळालाच पाहिजे’ तसेच ‘प्रकाश पोहरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात शेतकरी नेते प्रकाश पोहरे हातात खंजेरी घेऊन दिंडीत सहभागी झाल्याचेही दिसून आले.

या मोर्चातून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. १७ सप्टेंबरच्या मोर्चाबाबत आंदोलनापूर्वीही स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांच्या मोठ्या सहभागाचे आवाहन करण्यात आले होते.

संबंधित सामग्री

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

कोरचीतील धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली.

Sep 26, 2026
नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्यावा, तसेच पातूर तालुक्याच्या सिंचनासाठी विवरा धरणाचा प्रकल्पात समावेश करावा, अशी आमदार नितीनबापू देशमुख यांची मागणी.

Sep 18, 2026
पावसाचा जोर वाढला, पण शेतकरी हटले नाहीत; प्रकाश पोहरे यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी

पावसाचा जोर वाढला, पण शेतकरी हटले नाहीत; प्रकाश पोहरे यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी

नागभीड तहसील कार्यालयाजवळ मोर्चा पोहोचल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. तरीही शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. हजारो शेतकरी पावसातही ठामपणे उपस्थित राहिले.

Sep 17, 2026
गडचिरोलीतील प्रकल्पांसाठी सुपीक जमिनीच का? - प्रकाश  पोहरे

गडचिरोलीतील प्रकल्पांसाठी सुपीक जमिनीच का? - प्रकाश पोहरे

गडचिरोलीतील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी १३ गावांतील सुपीक जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी विरोध केला. पडीत जमीन व झुडपी जंगलावर प्रकल्प उभारण्याची मागणी.

Sep 09, 2026
२५ मागण्यांसाठी ९ सप्टेंबरला मोहाडीत धडक मोर्चा; आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

२५ मागण्यांसाठी ९ सप्टेंबरला मोहाडीत धडक मोर्चा; आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

मोहाडीत २५ प्रलंबित मागण्यांसाठी ९ सप्टेंबरला आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात येणार असून हजारोंनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Sep 07, 2026