शेतकरी आंदोलनाचा इशारा

डिझेल कॅनमध्ये देण्याची व खत दरवाढ कमी करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

Farmers Andolan: चिखली तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल निवेदन देण्याची शिवसेनेने मागणी केली गेली. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल कॅन उपलब्ध करून देण्याची मागणी

डिझेल कॅनमध्ये देण्याची व खत दरवाढ कमी करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

Farmers Andolan

शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन

चिखली (Farmers Andolan) : शिवसेना (मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवार, दि. १५ मे रोजी चिखली तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले. ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल कॅनमध्ये उपलब्ध करून देणे तसेच खतांच्या वाढलेल्या किमती तात्काळ कमी कराव्यात, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मशागतीची कामे सुरू असून त्यासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेल व पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेऊन पेट्रोलपंपावर तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे (Farmers Andolan) शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार ट्रॅक्टरसाठी कॅनमध्ये डिझेल देण्याची मागणी करण्यात आली.

तसेच खतांच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असून त्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे खतांच्या किमती तात्काळ कमी करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तथा मा. प्रा. नरुभाऊ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार चिखली यांच्याकडे सादर केले. सात दिवसांच्या आत खत दरवाढ कमी न झाल्यास तसेच कॅनमध्ये डिझेल उपलब्ध न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी विलासभाऊ सुरडकर (उपजिल्हा प्रमुख शिवसेना), श्रीकिसन धोंडगे पाटील (ता. प्रमुख शिवसेना तथा उपसभापती कृ.उ.बा.स. चिखली), वसंतराव झाल्टे (जिल्हा प्रमुख किसान सेना), श्रीरामभाऊ झोरे (शहर प्रमुख शिवसेना), अरुणभाऊ खडके (विधानसभा संघटक), विष्णुभाऊ मुरकुटे (ता. संघटक), अरुणभाऊ अंबासकर (उपजिल्हा प्रमुख किसान सेना), बी.टी. म्हस्के (तालुका समन्वयक), अशोक सुरडकर (उपजिल्हा प्रमुख युवासेना), आनंद गैची (शहर प्रमुख युवासेना), प्रितम गैची (शहर संघटक), सुनिल रगड (उप तालुका प्रमुख), पंजाजी विठोबा शेळके (उपशहर प्रमुख), बंटी कपूर (उपशहर प्रमुख), गजानन कुटे (विभाग प्रमुख), समाधान सावळे, आत्माराम भुतेकर (माजी सरपंच सवणा), उत्तमराव भुतेकर (ज्येष्ठ शिवसैनिक), कौतिकराव जाधव (उप तालुका प्रमुख), दीपक जाधव (युवासेना विभाग प्रमुख), गजानन जाधव (शाखा प्रमुख), संजुभाऊ कदम (शाखा प्रमुख), गजुभाऊ पवार (युवासेना तालुका प्रमुख), उमेश गजानन पवार, परमेश्वर गजानन पवार, भगवान पवार, समाधान पवार, विठ्ठल पवार, रामेश्वर सुरडकर, किसनराव कदम (उपशहर प्रमुख), अंबादास उकंडराव शिंदे, संतोष रिंढे (उप विभाग प्रमुख), राहुल वरवंडे, सोहेल शहा, वसंता अंभोरे (उप तालुका प्रमुख), बंडू गार्ड, रमेश झाल्टे, वसंता चौरे, राहुल मिसाळ (विभाग प्रमुख), समाधान जाधव (उपशहर प्रमुख), रवि पेटकर (उपशहर प्रमुख), जगू घुबे (उप विभाग प्रमुख) व बंडुभाऊ जाधव (उप तालुका प्रमुख) यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित सामग्री

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

Shiv Sena Farmers' Conference: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखी गंभीर समस्या थांबवण्यासाठी व्यावहारिक मार्ग असल्याचे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गट) नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026