मयत महिला परभणीतील जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथील रहिवाशी बोरी पोलिसात नोंद!
परभणी (Woman Death) : घरात काम करत असताना पाय घसरुन पडल्याने जखमी झालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान परभणीतील शासकीय रुग्णालयात शनिवार २३ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी २४ ऑगस्टला बोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
नागोराव शिंदे यांनी खबर दिली आहे. आश्रुबाई पांडूरंग शिंदे वय ६० वर्ष, रा. आसेगाव ता. जिंतूर, असे मयत महिलेचे नाव आहे. सदर महिला ही घरामध्ये काम करत असताना पाय घसरुन पडली. यामध्ये महिलेला मुक्कामार लागला. छातीत, पोटात दुखापत झाल्याने महिलेस उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. बोरी पोलिसात (Bori Police) नोंद करण्यात आली असून तपास पोह. गायकवाड करत आहेत.
गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या!
परभणी : शहरातील अलिबाग नगरात एका ३४ वर्षीय तरुणाने राहत्या घरात पंख्याला साडीने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली. ही घटना २३ ऑगस्टच्या रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली. रमाजी पंडित यांनी खबर दिली आहे. चोखाजी रमाजी पंडित वय ३४ वर्ष, असे मयताचे नाव आहे. कोतवाली पोलिसात (Kotwali Police) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास पोह. ताटीकोंडलवार करत आहेत.