Manora :- यावर्षी मानोरा तालुक्यामध्ये मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain) येऊन संत्रा फळबागाची फूट लवकर झाली व जून महिन्यामध्ये पावसाचा फार मोठा खंड पडला त्यामुळे संत्रा फुलाची व फळांची पूर्णपणे गळण झाली आहे. व जून महिन्यातील पावसाच्या खंडामुळे मानोरा तालुक्यातील संत्राचे बागेचे पूर्णपणे 100 % नुकसान झाले आहे.
नुकसानीचा पंचनामे करून पीकविमा मंजूर करण्यात यावा
तालुक्यातील शेतकरी(Farmer) यांनी आतापर्यंत फळबाग संत्रावर चाळीस टक्के एवढा खर्च केला आहे संत्रा फळबागांना खर्च हा इतर पिकापेक्षा फार मोठ्या प्रमाणात लागत असतो, आणि त्या बागेमध्ये मध्ये इतर पिक सुद्धा येत नाही त्यामुळे मानोरा तालुक्यातील फळबाग शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना वेळोवेळी निवेदन देवून नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई व पिक विमा द्यावा अशी मागणी केली होती. याबाबत दैनिक देशोन्नतीने देश विदेश डिजिटल पोर्टल (Digital Portal)व वृत्तपत्रात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची बातमी प्रकाशित केली होती. त्यानुसार पंचनाम्याला सुरुवात झाली आहे.
तालुक्यामध्ये फळबाग संत्राचे फारमोठे पूर्णपणे नुकसान झाले आहे
वेळोवेळी निवेदन देऊनही नुकसानीचा पंचनामे केले जात नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा शासन व प्रशासनाला दिला होता. याबाबत देशोन्नती देश विदेश पोर्टल न्यूज व दैनिक देशोन्नतीने(Daily promotion) वर्तमान पत्रात वृत्त प्रकाशित करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी ठळकपने वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे शासन व प्रशासन खडबडून जागे होत अखेर संत्रा नुकसानीच्या पंचनामे करण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाल्याने शेतकरी विशाल ठाकरे बेलोरा, सुधाकर चौधरी, सुनील देशमुख कोंडोलीकर, मुकेश काळे, दामोदर भोयर, गजानन अढाव, ओमप्रकाश चव्हाण, प्रवीण पुसांडे, गुलाब पवार आदींनी देशोन्नतीने आभार मानून कौतुक केले आहे.