विकास सुचक कल्पनेतून फाईव्ह स्टार हिंगोलीकर ही संकल्पना!
हिंगोली (Five Star Sengaokar) : शहरातील समस्त नागरिकांना व व्यापारी, शैक्षणिक आस्थापना यासह शासकीय कार्यालय (Government Office) यांनी फाईव्ह स्टार सेनगावकर या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या शहराची फाईव्ह स्टार रेटिंग बहुमान मिळविण्याचे आवाहन मुख्याधिकारी गणेश गांजरे यांच्यासह नगरपंचायत सेनगाव यांनी केले आहे.
फाईव्ह स्टार रेटिंगचा बहुमान मिळवण्यासाठी सर्वांनी या मोहिमेतत सहभाग होणे आवश्यक!
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (District Collector Rahul Gupta) यांच्या विकास सुचक कल्पनेतून फाईव्ह स्टार हिंगोलीकर ही संकल्पना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव नगरपंचायत अंतर्गत फाईव्ह स्टार सेनगावकर (Five Star Sengaokar) ही मोहीम नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व घरे व्यवसायिक आस्थापना व शैक्षणिक आस्थापना यासह शासकीय कार्यालयतील कार्यरत कर्मचारी अधिकारी (Personnel Officer) यांनी निकषानुसार सहभागी होऊन फाईव्ह स्टार रेटिंगचा बहुमान मिळवण्यासाठी सर्वांनी या मोहिमेतत सहभाग होणे आवश्यक असल्याचे मत मुख्याधिकारी गणेश गाजरे (Chief Officer Ganesh Gajare) यांनी व्यक्त केले आहे.
ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा यांचे विलीनीकरण करावे!
या फाईव्ह स्टार सेनगावकर मोहिमेतील निकषांमध्ये पावसाचे पडलेले पाणी इतर ठिकाणी वाया न घालवता त्यांचे पुनर्वापर व्हावा यासाठी जल पुनर्भरण (Water Replenishment) करणे आवश्यक आहे. आपल्या घराभोवती व इमारती शेजारी भागात किमान पाच झाडे लावावीत व त्याचे योग्य संगोपन करून त्याची जोपासना करावी, प्रत्येक घरातील महिलांनी व पुरुषांनी आपल्या घरामधील कचर्याचे ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा यांचे विलीनीकरण करावे. भविष्यात येणारी विद्युत टंचाई लक्षात घेता सर्व नागरिकांनी रूप-टॉप सोलर पॅनल अर्थात प्रधानमंत्री सूर्य घर योजना (Pradhan Mantri Surya Ghar Yojana) लाभ घ्यावा व तसेच नगरपंचायत मार्फत आकारण्यात येणार्या विविध कर व इतर बाकी विहीत व वेळेत रक्कम भरणा करावी वरील निकषाचे नागरिकांनी काटेकोर पालन करून त्यांचे संबंधित विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यांचे मूल्यांकन सुद्धा केले जाणार आहे.
फाईव्ह स्टार रेटिंग चा बहुमान मिळवण्यासाठी निकषाची पूर्तता करणे आवश्यक!
आपल्याला फाईव्ह स्टार रेटिंग चा बहुमान मिळवण्यासाठी निकषाची पूर्तता करणे आवश्यक असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश गाजरे यांनी दिले आहे. या 5 स्टार सेनगावकर या मोहिमेत सहभागी होण्यासाठी व त्यासाठी लागणारा मूल्यांकन फॉर्म नमुना हा सेनगाव नगरपंचायत (Sengaon Nagar Panchayat) मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. सदर मूल्यांकन फॉर्म दाखल करण्याची मुदत ही दि. 15 जून अखेर स्वीकारणार असल्याची माहिती देण्यात आली. या फाईव्ह स्टार सेनगावकर मोहिमेत शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, व्यवसायिक व शैक्षणिक व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून फाईव्ह स्टार सेनगावकर या मोहिमेचा फाईव्ह स्टार रेटिंग बहुमान मिळवावा असे आवाहन मुख्याधिकारी गणेश गांजरे यांनी केले आहे.