प्रकरणाशी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी
देसाईगंज (Desaiganj Prostitution) : सन २०२२ मध्ये ब्रम्हपुरी सेक्स रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी मंजीत लोणारे व त्याची पत्नी चंदा लोणारे या दाम्पत्यांना ब्रम्हपुरी पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणाचे देसाईगंज कनेक्शन समोर आले होते. दरम्यान त्याच प्रकरणाची पुनरावृत्ती करत मंजीत लोणारे याने दिल्ली येथे मॉडलिंगचा व्यवसाय करणार्या एका २६ वर्षीय महिलेला (Desaiganj Prostitution) देसाईगंज शहराच्या लॉजवर देहव्यापार करण्यास भाग पाडल्याचे समोर येते न येते, तोच शहराच्या अनेक लॉजवर अद्यापही देहव्यापाराचा गोरखधंदा जोमात सुरुच असल्याने संबंधित लॉजच्या संचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ब्रम्हपुरी येथील गजानन नगरीत वास्तव्यास असलेल्या मंजीत लोणारे तसेच चंदा लोणारे या दाम्पत्याने शहरात अल्पवयीन मुली आणुन सेक्स रॅकेट चालवित असल्याप्रकरणी अटक करून ब्रम्हपुरी पोलिसांनी बोलते केले असता, प्रकरणाशी संबंधित ९ जणांना अटक करण्यात आली होती. यावरून मंजीत हा अडचणीत असलेल्या गरजू मुलींच्या असहायतेचा फायदा घेत (Desaiganj Prostitution) देहव्यापार करायला भाग पाडत असल्याचे, यामुळे चव्हाट्यावर आले आहे. दिल्ली येथील २६ वर्षीय महिलेला पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्यासह, घर घेण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढल्यानंतर तिच्या मजबुरीचा फायदा घेत तिला देहव्यापार करण्यास भाग पाडले होते.
देसाईगंज येथील एका हॉटेल मध्ये तीन दिवस मुक्कामी असतांना मंजीतने तिच्याशी वारंवार (Desaiganj Prostitution) शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान लाखांदुर मार्गावरील एका हॉटेलच्या मागे किरायाने रुम घेऊन तिच्यासोबत एक महिना घालविल्यानंतर घर घेण्यास पैसे देऊ शकत नसल्याचे सबब पुढे करून आत्महत्या करण्याची बतावणी करून पैशासाठी तिला देहव्यापार करण्यास भाग पाडले. दरम्यान मंजितने तिला कुरखेडा येथील हॉटेल यतिरिक्तही अन्य हॉटेलात देहव्यापार करण्यास भाग पाडले असल्याने या गोरखधंद्यात हॉटेल व्यावसायीकांनीही ग्राहक शोधून देण्यात मदत केली असल्याचे सांगितले जात आहे.
देसाईगंज शहरात मोठ्या प्रमाणात हॉटेल असून अनेक हॉटेल ग्राहका अभावी खालीच राहात असल्याने हॉटेलचा मेंटेनन्स खर्च काढण्यासाठी म्हणून अनेक हॉटेल संचालक मंजीत सारख्या एजंटांना हाताशी धरून लॉजवर येणार्या कोणत्याही जोडप्याला कुठलेही ओळखपत्र न पाहताही ठराविक रक्कम घेऊन रुम देत असल्याचे सांगितले जात आहे.
देसाईगंज शहराच्या लौकीकास हरताळ
देसाईगंज शहर हे व्यापार नगरी म्हणून ओळखल्या जात असुन शहरात खरेदीसाठी लांबदुरवरून येणारे चांगल्या लॉजच्या शोधात असतात. मात्र काही आंबट शौकिनांना सक्रिय एजंट अलगद हेरून अगदी अल्पवयीन मुली पुरवत असल्याचे सांगितले जात आहे. लॉजवर सहजतेने ग्राहक उपलब्ध होत असल्याने या (Desaiganj Prostitution) गोरखधंद्यास लॉज संचालकांचीही मुक संमती राहात असल्यानेच देहव्यापाराचा हा धंदा शहरात अधिकच जोमाने सुरु असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे देसाईगंज शहराच्या लौकीकास हरताळ फासला जात असल्याने सबंधितावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.