World Elephant Day Gadchiroli :- जागतीक हत्ती दिनाचे औचित्य साधून गडचिरोली वनविभागाच्या (Gadchiroli Forest Department)वतीने जागतीक हत्ती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार व गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक आर्या व्हि.एस. यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक प्रविण पाटील, सहाय्यक वनसंरक्षक अंबरलाल मडावी, सहाय्यक वनसंरक्षक महेंद्र कुमार यादव यांचे उपस्थितीत दिनांक १४ ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिनानिमीत्य जन प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात कलापथकाचे सादरीकरण करण्यात आले.
गडचिरोली वनविभागाचा उपक्रम
गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद सारडा यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक येथून सुरूवात झाली. त्यानंतर गडचिरोली येथील रॅलीसोबत हत्तीचा देखावा ट्रॅक्टरवर सुशोभित करण्यात आला होता. या ठिकाणी कलापथकाने सादरीकरण केले. यात गडचिरोली प्रादेशिक वनपरीक्षेत्र व चातगाव प्रादेशिक वनपरीक्षेत्र या कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी व कर्मचार्यांचा सहभाग होता. ही यात्रा गडचिरोली वनपरीक्षेत्रातून माडे तुकूम, सालई टोला, खरपूंडी, दिभना, कळमटोला, पिपरटोला, धुंडेशिवणी मार्गे अमिर्झा येथे पाहोचली. तसेच चातगाव परीक्षेत्रातील कर्मचारी यांची रॅली हत्ती बाधित गावे खुर्सा, गिलगाव, आंबेशिवणी. भिकारमौशी, कळमटोला, पिपरटोला मार्गे अमिर्झा येथे पाहोचली. धुंडेशिवणी या ठिकाणी कलापथक सादरीकरणातून जन प्रबोधन करण्यात आले.
रॅलीच्या दरम्यान प्रत्येक गावात पॉम्पलेटचे वाटप
हत्ती पासून संरक्षण, हत्ती गावाशेजारी आल्यावर काय करावे, काय करू नये याबाबत वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी माहीती दिली. तसेच रॅलीच्या दरम्यान प्रत्येक गावात पॉम्पलेटचे वाटप करण्यात आले. शाळेतील मुलांना हत्तीचे महत्व पटवून देण्यात आले. रॅलीची सांगता अमिर्झा येथे करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी गडचिरोली व चातगाव वनपरीक्षेत्रातील (Forest area)अधिकारी व कर्मचारी यांचे संयुक्त नियोजनाने सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रदिप गेडाम, किर्तीचंद कर्हाडे, अमित दंडेवार, परशुराम मोहुर्ले, जितेंद्र सोरदे, साईदास मडावी, सुनिल पेंदोरकर, पंडीत राठोड, जगदिश मानकर, राकेश मगनुरवार, गणेश धंदरे, भास्कर गजभे, संजु टेंभुर्णीकर यांनी सहकार्य केले.