वर्धा (Wardha) :- केवायसी अपडेटच्या नावाखाली व्हाटसअॅवर आलेली एपीकेफाईलमधील लिंक ओपन करताच व्यक्तीच्या खात्यातून तब्बल चार लाख रुपये लंपास करण्यात आले. २६ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळखुटा येथील व्यक्ती व्हॉटसअॅप (WhatsApp) बघत होते. त्यावेळी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra)केवायसी अपडेट नावाची एपीके फाईल दिसली. त्यांनी फाईल ओपन केली असता त्यांनी लिंक क्लिक केली. लिंक क्लिक केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तब्बल चार लाख ५०० रुपये कपात झाल्याचा संदेश मिळाला. केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली अज्ञात व्यक्तीने चार लाख ५०० रुपयांनी ऑनलाईन फसवणूक (Fraud) केली. याप्रकरणी दिलीप तेलमोरे रा. पिंपळखुटा यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.