परभणीच्या गंगाखेड शहरातील घटना!
परभणी (Fraud of Theft) : परभणीतील गंगाखेड येथे शीकॉमर्स मार्केट प्रा.लि. सर्व्हीस शाखेच्या दुकानातील (Shop) साहित्य जाळून चोरी झाल्याचा बनाव करत फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार ७ ते ८ जुलै या दरम्यान गंगाखेडातील नवा मोंढा परिसरात घडला. सदर प्रकरणी तब्बल तीन महिन्यांनी १२ ऑक्टोबरला फसवणुकीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
साठेआठ लाखाची फसवणुक!
अभिजीत देशमुख यांनी तक्रार दिली आहे. शाखा व्यवस्थापक (Branch Manager) प्रकाश थावरु चव्हाण याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीने स्वत:च कंपनी मधील गंगाखेड येथील शाखेच्या शटरचे कुलूप तोडून कॅशबुक, रिसीप्ट बुक, बुक रजिस्टर आदी जाळून चोरीचा बनाव करत ८ लाख ४८ हजार ३४२ रुपयांचा अपहार केला असावा असा संशय आहे. अपहार झालेल्या रक्कमेची चौकशी करण्यात यावी. तसेच फसवणुक केल्या प्रकरणी संबंधीतावर गंगाखेड पोलिस ठाण्यात (Gangakhed Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सपोनि. आदित्य लोणीकर करत आहेत.