पैसे चोरल्याच्या कारणावरून घडले हत्याकांड
विरली (बु.) येथील धक्कादायक घटना
विरली/बु. (Friend Brutal Murder) : अत्यल्प पैसे चोरल्याच्या वादातून सोबत्यानेच सोबत्याची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यात घडली. ही घटना आज २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विरली (बु.) येथील पौना (बु.) ते विरली (बु.) कालव्याच्या पाळीवर घडली. नरेश रामकृष्ण दुनेदार वय अंदाजे ४५ वर्षे रा. विरली/बू असे घटनेतील मृतक इसमाचे नाव आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास येथीलच नरेश दूनेदार आणि नारायण मेश्राम हे दोघेही पौना (बु.) ते विरली (बु.) कालव्याच्या पाळीशेजारील नालितील मासोळ्या पकडण्यासाठी सोबतीने गेले होते. दरम्यान, काही पैसे चोरल्याचा कारणावरून त्यांच्यात कालव्याच्या पाळीवरच वाद निर्माण झाला. या (Friend Brutal Murder) वादातून नारायण मेश्राम यांनी मृतक नरेशला हाथा बुक्क्यांनी आणि मोठ्या दगडाने बेदम मारहाण केली.
आणि त्याला कालव्याच्या शेजारील नालीत खेचत नेवून फेकले. यावेळी, मृतक नरेश दुनेदार यांच्या खिशात धानाचे मिळालेले १० हजार रुपये असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे नारायण मेश्राम यांनी (Friend Brutal Murder) मृतकला मारहाण केल्यानंतर तो स्वतः गावात जाऊन नरेशला मारल्याचे सांगत असल्याच्या चर्चाही गावात आहेत.
या घटनेची माहिती गावात वार्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. याची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. या माहितीवरून लाखांदूर पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली आणि गर्दीवर नियंत्रण ठेवले. पोलिसांनी मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी लाखांदूर शवागारात पाठविले. (Friend Brutal Murder) मृतक नरेश दुनेदार हा गावात पान टपरीचा व्यवसाय करीत होता. त्याच्या मृत्यूपश्चात २ मुले, पत्नी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.




 
			 
		

