देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hasan Mushrif: पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा: हसन मुश्रीफ
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Hasan Mushrif: पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा: हसन मुश्रीफ
मुंबईदेशराजकारण

Hasan Mushrif: पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा: हसन मुश्रीफ

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/16 at 4:17 PM
By Deshonnati Digital Published October 16, 2025
Share
Hasan Mushrif

मुंबई (Hasan Mushrif) : राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी समिती स्थापन करावी. या समितीने महात्मा फुले जन आरोग्य योजना, केंद्र शासन आणि मध्यप्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री (Hasan Mushrif) हसन मुश्रीफ यांनी दिले. पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. (Cashless Health Care Yonaja) पत्रकारांच्या आरोग्य समस्यांबाबत मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारी, माहिती व जनसंपर्क संचालक किशोर गांगुर्डे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्ष यदु जोशी, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मुंबई विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष दीपक कैतके, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य विनोद जगदाळे, नेहा पुरव, संजय मलमे, संजय पितळे, जयेश सामंत उपस्थित होते.

मध्य प्रदेश मधील पत्रकारांसाठीच्या कॅशलेस आरोग्य सेवा योजनेचा (Cashless Health Care Yonaja) अभ्यास करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे राज्य समन्वयक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि पत्रकार यांची समिती स्थापन करावी असे सांगून वैद्यकीय शिक्षण मंत्री (Hasan Mushrif) मुश्रीफ म्हणाले की, या समितीने राज्य शासनाच्या आरोग्य योजना, केंद्राच्या आरोग्य योजना यांचाही अभ्यास करून सविस्तर सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करावा. त्यामध्ये ‘सीएसआर’चाही विचार करावा. मोठ्या शहरांमध्ये पत्रकारांना कशा प्रकारे कॅशलेस आरोग्य सेवा देता येतील याचा त्यात प्रामुख्याने विचार व्हावा, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले.

पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर: प्रकाश आबिटकर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) म्हणाले की, पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर घेताना महिला पत्रकारांसाठीही विशेष शिबिर घ्यावे, महात्मा फुले जन आरोग्य योजना पत्रकारांनाही लागू आहे. त्याच्या कार्डचे (Cashless Health Care Yonaja) पत्रकारांना वाटप व्हावे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सध्या अस्तित्वात असलेली शंकरराव चव्हाण पत्रकार सन्मान निधी योजना आणखी व्यापक करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा असेही सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले. यावेळी आरोग्य सचिव निपुण विनायक यांनी सध्या अस्तित्वात असणाऱ्या आणि पत्रकारांनाही लागू असणाऱ्या आरोग्य योजनांची सविस्तर माहिती दिली. तर पत्रकार संघाचे अध्यक्ष यदु जोशी यांनी पत्रकारांची भूमिका मांडली.

You Might Also Like

Meta: महत्त्वाची बातमी; ‘हे’ मेटा ॲप होणार बंद!

Flood Affected District: सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी 1356 कोटीची मदत

Gadchiroli : कोणत्याही जातीचा समावेश आदिवासी संवर्गामध्ये केला जाणार नाही..! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Tirupati Threat: दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर तिरुपती हाय अलर्टवर!

Pakistan Suicide Attack: पाक सीमेवर आत्मघातकी हल्ला; 7 पाकिस्तानी सैनिक ठार

TAGGED: Adv. Ashish Shelar, ajit pawar, Chandrasekhar Bawankule, Chhagan Bhujbal, CM Devendra Fadnavis, Dadaji Bhuse, eknath shinde, Girish Mahajan, Hasan Mushrif, MLA Abu Azmi, MLA Ambadas Danve, MLA Manoj Jamsutkar, MLA Parinay Phuke, Prakash Abitkar, Uddhav Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal suicide : पळशी येथे शेतकर्‍याची आत्महत्या

Deshonnati Digital Deshonnati Digital August 18, 2025
Pusad rain: पहिल्याच पावसात अशी अवस्था; रस्त्याने चालणे अवघड, सर्वत्र चिखलमय
Police Bharti: पहिल्या दिवशी २८१ उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी
Washim : दोन दुचाकीची आमोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी
Test post title
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Meta
Breaking Newsतंत्रज्ञानदिल्लीदेश

Meta: महत्त्वाची बातमी; ‘हे’ मेटा ॲप होणार बंद!

October 17, 2025
Flood Affected District
Breaking Newsमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारण

Flood Affected District: सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी 1356 कोटीची मदत

October 17, 2025
विदर्भगडचिरोलीराजकारण

Gadchiroli : कोणत्याही जातीचा समावेश आदिवासी संवर्गामध्ये केला जाणार नाही..! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 17, 2025
Tirupati Threat
Breaking Newsअध्यात्मक्राईम जगतदेशमहाराष्ट्र

Tirupati Threat: दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर तिरुपती हाय अलर्टवर!

October 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?