पदावर गदा येण्याची शक्यता!
कोरची (Electricity Theft) : कोरची येथील नगराध्यक्ष हर्षलता भैसारे (Mayor Harshalata Bhaisare) यांना दिनांक 27 जून 2025 ला दुपारी 4.30 च्या दरम्यान वीज चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या निवासस्थानाला लागुनच मुख्य रस्त्याच्या कडेला त्यांचेच जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. जनरल स्टोअरला कमर्शियल मीटर (Commercial Meter) लावने गरजेचे आहे. परंतु त्यांनी आपल्या राहत्या घरी घेतलेल्या आर एल मीटर वरूनच दुकानात वीज जोडली आहे. जनरल दुकानातील झगमगाट आणि वीजेचा बील एवढा कमी कसा येतो, हा प्रश्न वीज कंपनीच्या (Electricity Company) कर्मचाऱ्यांना पडला. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या पथकाने (Electricity Distribution Company Team) हा छापा टाकला. आर. एल. मीटरची वीज सी. एल. साठी वापरण्यात येत होती. एकंदरीत वीज चोरी (Electricity Teft) केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गंभीर गुन्ह्यात सापडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त!
विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी सुमीत वांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भैसारे यांच्या जनरल दुकानात मीटरच नाही. हेतूपुरस्सर त्यांनी आर एल मीटर चा वापर करीत होते. त्यामुळे वीजेचा वापर कमी दाखविण्यात येत होता. पथकाला संशय आल्याने त्यांनी दिनांक 27/6/2025 ला दुपारी 4.30 च्या दरम्यान, अचानक तपासणी केली असता, हा प्रकार उघडकीस आला. शनिवार व रविवारी सरकारी सुट्टी असल्याने किती लोड वीज चोरी होत होती, याचा आकडा सोमवारी मिळेल. त्यानुसार दंडाची रक्कम ठरविण्यात येईल, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी वांढरे यांनी सांगितले. हर्षलता भैसारे यांनी आर्थिक दंड (Financial Penalty) भरण्यास तयारी दर्शविली आहे. असेही वांढरे यांनी सांगितले. या घटनेमुळे नगराध्यक्ष हर्षलता भैसारे यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे त्या शहराच्या विकासाची जबाबदारी सांभाळत असताना, दुसरीकडे स्वतः च वीज चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यात सापडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.