Gadchiroli :- राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. खाद्य तेल (edible oil) अभियान सन २०२५-२६ रब्बी हंगाम अंतर्गत पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारत घेता संकरीत बियाणे वाणाचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पिक प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकरी गट हा ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणीकृत असावा. सर्व बाबीचा लाभ घेण्यासाठी लाभधारकाने अग्रीस्टाक (Agristock) व नोंदणी करून फार्मर आयडी काढलेले असणे आवश्यक आहे.
७/१२ उताराच्या आधारे प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य तत्वावर लाभ देण्यात येईल
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान (Pulses) योजनेअंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण हरभरा या पीकासाठी अनुदान दर हा १० वर्ष आतील ५० टक्के किंवा ५००० रूपये प्रति क्विंटल यापैकी किमान प्रमाणे अनुदान किंवा १० वर्षावरील ५० टक्के किंवा २५०० रूपये प्रति क्विंटल याप्रमाणे किमान प्रमाणे अनुदान राहील. ७/१२ उताराच्या आधारे प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य तत्वावर लाभ देण्यात येईल. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची आवश्यकता नसून महाबीज डिलर मार्फत बियाणे वितरीत करण्यात येईल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान पिक प्रात्याक्षिक अंतर्गत हरभरा व रब्बी ज्वारी करीता१०० टक्के अनुदान देण्यात येईल. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था ई. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य तत्वावर लाभ देण्यात येईल.तसेच राष्ट्रीय खाद्य तेल अभियान अंतर्गत करडई करीता १०० टक्के अनुदान देण्यात येईल.