चौघांना अटक; १ लाख ९१, ६२४ रु. मुद्देमाल जप्त
पुसद (Pusad Fake currency) : काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहीतीवरून नवीन पुसद येथील किराया च्या रुम मध्ये राहणार्या राजकुमार पारधी याच्याकडे आलेले काही संशयीत इसम ५०० रु. दराच्या बनावट चलनी नोट (Pusad Fake currency) तयार करित असल्याची गोपनिय माहीती मिळाली.
त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से) स.अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप (म.पो.से),उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी जे सा. (भा.पो.से), पोलीस निरीक्षक सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, पोहवा मुन्ना आडे, संतोष भोरगे, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, तेजाब रणखांब, सुनिल पंडागळे, पोउपनि रविंद्र श्रीरामे, पोशि राजेश जाधव यांच्या पथकाने घटना स्थळी चारही बाजूने सापळा लावला.
यावेळी संशयीरित्या हालचाल करतांना दिसून आलेल्या इसमाला शिताफिने ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजकुमार श्रावन पारधी रा. सावळी ता. मानोरा जि.वाशिम असे सांगून याच घरात परिवारासह परिवारासह भाडयाने राहत असल्याचे सांगितले. त्याचे समक्ष घरात प्रवेश केला असता घराच्या बेडरुम मध्ये ३ इसम ५०० रु दराच्या चलनी नोटा, दोन वर्तुळाकार काच, तसेच ५०० रुपयांचे नोटाचे आकारचे कोर्या कागदाचे बंडलच्या सहाय्याने वेगवेगळ्या कंपनीचे केमीकलच्या बॉटल व केमिकल मिश्रीत नोटाचे आकाराचे काळपट कागदाच्या सहाय्याने भारतीय बनावटीचे चलनी नोटा बनवित असल्याचे दिसून आले.
पंचा समक्ष त्याचे समोरील ५०० रु. दराच्या नोटाची (Pusad Fake currency) पडताळणी केली असता त्याचे ताब्यात (Pusad Fake currency) ५०० रु. दराच्या ११७ चलनी नोटाची प्रखर लाईटच्या उजेडात निरीक्षण केले असता त्यामध्ये ४ नोट बनावट असल्याचे दिसून आल्याने राजकुमार श्रावन पारधी रा. सावळी ता. मानोरा जि.वाशिम सध्या रा.नवीन पुसद ता. पुसद जि. यवतमाळ, तुकाराम दामाजी गुहाडे रा.हर्षी ता. पुसद जि. यवतमाळ, भाउसाहेब आनंदराव पतंगे रा. कोंढूर ता. कळमनुरी जि. हिंगोली,रामदास किसन भरकाडे रा. डोणवाडा ता. वसमत जि. हिंगोली असे सांगितले.
घटना स्थळावरून ५०० रु. च्या नोटाचे आकारचे को-या कागदाचे बंडल, (Pusad Fake currency) वेगवेगळया कंपनीचे केमीकलच्या बॉटल व केमिकल मिश्रीत नोटाचे आकाराचे काळपट कागद, २ गोलाकार काच तसेच ५०० रु.च्या ४ बनावट नोटा, तसेच ५०० रुपये दराच्या ११३भारतीय चलनी नोटा व इतर साहीत्य असे एकूण १,८९,६२ रु. मुद्देमाल ताब्यात घेवून वरील ४ सह पंडीत भालेराव रा. शिवनी ता. कळमनुरी जि. हिंगोली अश्या ५ जणांविरुध्द पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.