माजी आ. घनदाट मामा यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी
परभणी/गंगाखेड (Gangakhed Assembly Elections) : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांना उमेदवारी जाहीर होताच माजी आ. तथा अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम घनदाट मामा यांनी गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील राजगृहात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून (Gangakhed Assembly Elections) गंगाखेड विधानसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेतल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पहावयास मिळत आहे.
गंगाखेड विधानसभा मतदार संघातून तब्बल तीन वेळा अपक्ष निवडून आलेल्या माजी आ. तथा अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम घनदाट यांनी २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन तुतारी चिन्हावर विधानसभा निवडणूक (Gangakhed Assembly Elections) लढवायची तयारी केली. मात्र (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाटेला हा मतदार संघ गेल्याने बुधवार रोजी शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत गंगाखेड येथील उमेदवारी जिल्हा प्रमुख विशाल कदम यांना जाहीर केल्याने नाराज झालेल्या माजी आ. सिताराम घनदाट मामा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिट्ठी देत गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळीच राज गृह मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांची भेट घेत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून गंगाखेड विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मिळविली आहे.
यावेळी त्यांच्या समवेत अमित दादा घनदाट, मधुसूदन लटपटे, दत्तराव भोसले, कैलास रुद्रवार, वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हा निरीक्षक शुद्धोधन सावंत, गंगाखेड तालुकाध्यक्ष निवृत्ती केदारे, मुंजाजी टोम्पे, संतोष भालेराव यांच्यासह अन्य पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आ. घनदाट मामा यांचा प्रवेश झाल्याने वंचित बहुजन विकास आघाडीची ताकद वाढल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी जल्लोष करत माजी आ. सिताराम घनदाट मामा यांच्या उमेदवारीचे स्वागत करत गंगाखेड विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
माजी आ. घनदाट यांच्या बंडाखोरीचा फटका बसणार
महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या माजी आ. सिताराम घनदाट मामा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामाराम ठोकत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून उमेदवारी मिळवीत बंडाखोरी केल्याने याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसणार असल्याची राजकीय वर्तुळात होत आहे.