आखाडा बाळापूर/हिंगोली (Gangakhed Dead body) : बोल्डा फाटा शिवारात बाभळीच्या काट्यामध्ये शनिवारी आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असुन तो गंगाखेड येथील तरूणाचा असल्याचे स्पष्ट झाले.
आ. बाळापूर पोलिस ठाणे हद्दितील बोल्डा फाटा शिवारात १२ एप्रिलला सकाळच्या सुमारास बाभळीच्या झाडाच्या काट्यात एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर पोत्रा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह ठेवण्यात आला होता. (Gangakhed Dead body) पोलिसांनी जिल्ह्यातील हद्दीमध्ये हरवलेल्या व्यक्तींची माहिती मागवून परिसरातील सोशल मिडीयावर मयताचे छायाचित्र पाठविले होते. त्यावरून सदर मृतदेह गंगाखेड, आंबेजोगाई येथील तरूणाचा असावा अशी प्राथमिक माहिती मिळाली.
त्यावरून पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, जमादार पंढरी चव्हाण यांनी त्या भागात माहिती पोहचविली असता १३ एप्रिल रविवार रोजी सकाळी मृतदेहाची ओळख पटली. ज्यामध्ये सुनिल तुकाराम एगंडे (४५) रा. गंगाखेड हा असल्याचे स्पष्ट झाले. सुनिल यांचे वडील पोतरा येथे नौकरीला होते. त्याचे शिक्षणही पोत्रा येथे झाले होते. (Gangakhed Dead body) दरवर्षी पोत्रा येथे यात्रेसाठी येत होता. त्यामुळे तो आला असावा असा अंदाजही वर्तविण्यात आला. सुनिलचे नातेवाईक दाखल झाले आहेत. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे. सुनिल यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.