भंडारा रोड व नागपूर रेल्वे पोलिसांची संयुक्त कारवाई
मोहाडी (Puri Gandhidham Express) : पुरी-गांधीधाम ह्या साप्ताहिक एक्सप्रेस मधून गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. शासकीय रेल्वे पोलिसांनी तपास मोहीम राबवित गांधीधाम एक्सप्रेसमधून तब्बल १ लक्ष २६ हजार ९६० रुपयाचा गांजा जप्त केला. सदर कारवाई भंडारा रोड व सीआयबी नागपूर शासकीय रेल्वे पोलिसांनी केली. रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करीत प्रकरण पुढील तपसाकरीता गोंदिया रेल्वे पोलिसांकडे वळते केले आहे.
रेल्वे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाच्या तस्करीवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात रेल्वे पोलीस बर्यापैकी यश मिळत असून आतापर्यंत अनेक तस्करावर कारवाई केल्याचे दिसून येते. २२ जुलैला गाडी क्र. १२९९४ पुरी गांधीधाम या (Puri Gandhidham Express) एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. सदर गाडीचा थांबा भंडारारोड येथे नसतो.
मात्र सदर गाडीला भंडारारोड रेल्वेस्थानकात थांबा देत पोलिसांनी गाडीत तपास मोहीम सुरु केली. यात गाडीमधील स्लीपर कोच क्र.एस. ०३ बर्थ क्रमांक ३३ खाली एक बेवारस मैरून रंगाची बॅग आढळली. बॅगेची तपासणी केली असता यामध्ये गांजा असल्याचे दिसून आले. (Puri Gandhidham Express) रेल्वे पोलिसांनी गांजा जप्त केला. वजन केले असता गांजाचे वजन ६ किलो ३४८ ग्राम असल्याचे दिसून आले. जप्त केलेल्या गांजाचे बाजार मूल्य १ लक्ष २६ हजार ९६० रुपये आहे. गाडी नागपूरला पोहचल्यानंतर नागपूरच्या शासकीय रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपराध क्रमांक क्र. ३७७/२०२५ धारा २० (बी) आयआय (बी )एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरण गोंदिया क्षेत्रातील असल्याने रेल्वे पोलीस गोंदिया यांना प्रकरण स्थान्तरीत करण्यात आले. पुढील तपास गोंदिया रेल्वे पोलीस करीत आहेत. सदर कारवाई बिलासपूर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे सहप्रधान मुख्यसुरक्षा आयुक्त मुन्नवर खुर्शिद यांच्या निर्देशानुसार, नागपूर मंडळ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनात भंडारा रोड रेल्वे स्टेशनचे निरीक्षक एलिजाबेथ पवार सोबत कर्मचारी प्रधान आरक्षक ईशांत दीक्षित, आर.के. श्रेष्ठ, आर. खापरे यांनी केली. यावेळी रेल्वेत प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचे प्रतिबंधित अंमली पदार्थ गांजा, दारू, तंबाखू सारखे मादक पदार्थ आढल्यास प्रवाशांनी सदर माहिती रेल्वे पोलिसांना देण्याचे आवाहन (Puri Gandhidham Express) रेल्वे पोलिसांनी केले आहे.