शहरातील सर्व गणेश भक्तांनी सहभाग घ्यावा असे आवाहन!
हिंगोली (Ganpati Decoration Competition) : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (Nationalist Students Congress) तर्फे हिंगोली गणपती डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन जिल्ह्यातील गणेश भक्तांसाठी करण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने इंस्टाग्राम रीलच्या स्वरूपात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना १०,००० रूपयांची रोख बक्षिसे देण्यात येतील स्पर्धेच्या माहितीसाठी 8379020708 या क्रमांकावर DM करावा. या स्पर्धेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील व शहरातील सर्व गणेश भक्तांनी सहभाग घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली शहराध्यक्ष केशव भैय्या दुबे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सचिव सुजय देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी जिल्हाध्यक्ष तेजस पवार यांनी केले आहे.




 
			 
		

