तुमसर (Girl committed suicide) : तालुक्यातील डोंगरला येथे ६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. माही सुनील राणे (वय १५) रा.डोंगरला असे (Girl committed suicide) आत्महत्या करणार्या तरुणीचे नाव आहे. माही ही इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती अशी माहिती आहे.
घटनेच्या दिवशी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या दरम्यान घरात कुणीही नसतांना माहीने पंख्याला ओढणीच्या साहाय्याने (Girl committed suicide) गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी माहीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून आरडाओरड केली. घटनास्थळी लगेचच ग्रामस्थांनी गर्दी केली आणि याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात आली.
माही ही तुमसर येथील एका शाळेत वर्र्ग १०वीं मध्ये शिक्षण घेत होती. अभ्यासात हुशार आणि मनमिळावू स्वभावाची असलेल्या माहीच्या अचानक घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत (Girl committed suicide) आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. पोलीस तपास सुरू असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.(ता.प्र)