युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल!
मानोरा (Girl Molestation) : मानोरा पोलीस स्टेशन (Manora Police Station) अंतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस (Police) सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार तुझ्याशी लग्न करतो म्हणून एका युवकाने अल्पवयीन मुलीस दि. 25 एप्रिल रोजी पळवून नेले होते. एका महिन्यानंतर, पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर, (Complaints) गावातील एका युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. सदरील घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.




