लोखंडी पाईपला साडीने घेतला गळफास
परभणीच्या गंगाखेड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद
परभणी/गंगाखेड (Girl suicide Case) : शहरातील अरुणोदय कॉलनीतील २१ वर्षीय युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार २२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील अरुणोदय कॉलनीतील अर्चना उत्तम कराळे (वय २१ वर्षे) या युवतीने रविवार २२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरातील आडव्या लोंखडी पाईपला साडीने गळफास घेऊन (Girl suicide Case) आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच सपोउपनी राम गिते, जमादार मारोती माहुरे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी अच्युत व्यंकटराव कराळे वय ४५ वर्ष यांनी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याचा पुढील तपास सपोनि शिवाजी सिंगनवाड करीत आहेत.
चिट्ठी आढळली
“ही आत्महत्या मी स्वत: करीत आहे. माझ्या मरणाला कोणाला ही दोषी ठरवु नये. आय मिस यु आई, पापा”, अशा आशयाची चिठ्ठी (Girl suicide Case) आत्महत्या करण्यापुर्वी मयत युवतीने लिहुन ठेवल्याचे समजले असून सदर युवती परभणी येथे डी. फार्मसीचे शिक्षण घेत असल्याचे तसेच अभ्यासाच्या तणावातून तिने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांच्या चर्चेतून समोर आली आहे.