जीवे मारण्याची दिली धमकी!
परभणी (Girls Harassment) : परभणीतील मानवत तालुक्यातील एका महिलेच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिचा विश्वास संपादन करत महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर महिलेच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीलाही धमकी देऊन तिच्यावरही अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन १९ ऑक्टोबरला आरोपीवर मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
परभणीच्या मानवत पोलिसात नोंद!
पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, आरोपीने मागील पाच ते सहा महिन्यापासून पिडीतेच्या आईचा विश्वास संपादन करत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पिडीतेच्या आईचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर आरोपीने १४ वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलीवरही बळजबरीने अत्याचार केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पिडीतेच्या आईने जाब विचारल्यावर जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली. पिडीतेच्या आईचे फोटो नातेवाईकांना पाठवुन बदनामी केली.
या त्रासाला कंटाळलेल्या पिडीतेने गणेश कारभारी काळे याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अत्याचार, पोक्सो, अॅट्रॉसिटी अंतर्गत मानवत पोलिसात (Manawat Police) गुन्हा नोंद झाला आहे. तपास सेलू उपविभागीय पोलिस अधिकारी करत आहेत.