Gondia:- “राष्ट्रीय सेवा योजना हे समाजाशी जोडण्याचे एक माध्यम आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात ठेवून समाजासाठी काही तरी करण्याची इच्छा ठेवून या माध्यमातून विद्यार्थी आपला व्यक्तीमत्व विकास साधू शकतात” असे मत प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी व्यक्त केले. स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा करण्यात आलं.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा
या प्रसंगी ते बोलत होतें. कार्यक्रमाची सुुरूवात राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमांचे प्रस्ताविक डॉ. आशिष कावळे कार्यक्रम अधिकारी यांनी केले. याप्रसंगी डॉ. ईश्वर मोहूर्ले प्राचार्य, श्री. संदेशकुमार पतेह एम के सी एल गोंदिया, डॉ. सिबी आयक्यूएसी समन्वयक, डॉ. आशिष कावळे, प्रा. लक्ष्मीकांत कापगते, डॉ. स्वाती मडावी, प्रा. अंकित नाकाडे, प्रा. पंकज उके, रासेयो कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयातील (College)प्राध्यापक उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांकरिता कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयावर मागदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते व सर्व उपस्थित विद्यार्थांना स्वच्छता शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन कू. कृपाली गुरणुले व आभार कु. कैफिया शेख यांनी मानले. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.