लाखांदुर तालुक्यातील शेकडो एकर शेती पाण्याखाली येवून धानपिकाचे मोठे नुकसान
कालव्याचे निकृष्ट तथा नियोजन शुन्य बांधकामाचा फडका; शेतकर्यांकडुन नुकसान भरपाईची मागणी
लाखांदूर (Gosekhurd Project) : गोसेखुर्द प्रकल्प शेतकर्यांना शाप की वरदान हे कोड्डे न उलघडण्यासारखे असून गोसेखुर्द डाव्या कालव्याचे निकृष्ट, अपुर्ण व नियोजन शुन्य बांधकामाचा तालुक्यातील शेतकर्यांचे शेकडो एकर धानपिकाचे दरवर्षी नुकसान होत असल्याचे पाहावयास मिळत असून गोसेखुर्द डावा कालवा बांधकाम तथा महसूल प्रशासनाला नियमित दरवर्षी लेखी निवेदने, तक्रारी तथा शाब्दीक समस्यांची माहीती देवूनही दुरुस्तीव्दारे ना समाधान ना नुकसान भरपाई यामुळे शेतकरी शासन- प्रशासनाचे भ्रष्ट व निष्काळजीपणाचा शिकार झाला असून शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे.
हल्ली या चार दिवसात तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला असता शेतशिवार, नदी, नाले व कालवे भरुन ओसंबुन वाहत असता आसोला उपकालव्याचे सावरगाव शेतशिवारात कालव्याचे योग्य बांधकाम नसल्याने नियमित फुटत आहे. त्याच परीसरात कालव्याला भगदाड पडून कालव्यातील पाणी शेतशिवारात शिरले व या पाण्याने जवळपास २० ते २५ एकर शेतीतील धान पिक पाण्याखाली आले असून मोठे नुकसान होत आहे.
तसेच याच गावातील शेतशिवारातील पाणी कालव्यामुळे अडून ३० ते ४० एकर शेती पाण्याखाली असल्याचे पाहावयास मिळत आहे. या शेतकर्यांचे आधी धान पर्हे गेले, मग पर्हे विकत घेवून रोहणी केली तीही बरीच गेली. मग दुरुस्ती अशी तिनदा मशागत करुन मोठा खर्च झाला व आता कालव्याला भगदाड पडल्याने तीही पाण्याखाली शेतकर्यांनी करावे काय? करीता सदर शेतीतील धान पिकाचे कालवा व महसूल प्रशासनाने नुकसानीची पाहणी करुन नुकसान भरपाई द्यावी व भविष्यात नुकसान होणार नाही या (Gosekhurd Project) उपाययोजना करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.
तालुक्यात गोसेखुर्द डाव्या कालवा (Gosekhurd Project) व त्यांचे लघु, उपकालवे व वितरीकेचे बांधकाम हे निकृष्ट, अपुरे, नियोजन शुन्य व त्यांचे पाण्याचा विसर्ग नदीनाल्याना न केल्याने व काही कालव्यामुळे शेतशिवारातील पाणी अडत असल्याने सरांडी/बु. राजनी, ओपारा, कर्हांडला, रोहणी, नांदेड, सावरगाव, खैरी/पट अशा बहुतांश गावातील शेती पिकाचे नुकसान दरवर्षी होत आहे. यासबंधी लेखी व शाब्दीक तक्रारी करुनही ना नुकसान भरपाई ना ठोस उपाययोजना केली. त्यामुळे बहुतांश गावातील शेतकर्यांचे नुकसान होत असून शेतकरी मेटाकुटीस आल्याचे पाहावयास मिळत आहे.
आमचे गावातील कालव्याचे निकृष्ट, अपुर्ण व अयोग्य बांधकामाने कालवे कधी फुटुन, कधी भगदाड पडून तर कुठे (Gosekhurd Project) कालव्याचे बांधकामाने पाणी अडून शेतशिवारात पुरपरीस्थीती निर्माण होत असून मी तिनदा रोवणी करुन मोठा खर्च केला आहे. मात्र हल्ली कालव्याला भगदाड पडल्याने शेतीतील धान पिकाचे मोठे नुकसान होत आहे. या करीता कालवे व महसूल प्रशासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यासह ठोस उपाययोजना करावी.
–जयगोपाल लांडगे, शेतकरी सावरगाव