उन्हाळी हंगामात धान्य खरेदीसाठी आधारभूत धान्य खरेदी सेंटर तात्काळ सुरू करा!
कोरची (Grain Buying Center) : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे (State Govt) हमीभावाने धान खरेदीसाठी आधारभूत धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी ई-पीक नोंदणी करून हमीभावाने धान विक्रीसाठी (Sale of Paddy) तयारी केली आहे. परंतु, खरेदी केंद्रे वेळेत सुरू न झाल्यामुळे त्यांना गंभीर आर्थिक संकटाचा (Financial Crisis) सामना करावा लागत आहे.
कष्टाचा सन्मान राखत आणि त्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी खरेदी केंद्रे अविलंब सुरू करावे!
धान उत्पादक शेतकरी खरीप आणि उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र, शासनाची खरेदी केंद्रे वेळेवर सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) दोनदा खर्च करावा लागत आहे. पहिल्यांदा धान साठवण्यासाठी गोदाम, पोती आणि वाहतुकीचा खर्चकरावा लागतो आणि नंतर खरेदी केंद्र सुरू झाल्यावर तेच धान केंद्रावर नेण्यासाठी पुन्हा वाहतुकीचा खर्च येतो. यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. याशिवाय, उन्ह तापत असताना शेतकऱ्यांना त्या जड पोत्यांचे भरणे आणि ट्रकमध्ये लोड करणे ही एक तारेवरची कसरतच असते. मजुरांची टंचाई आणि प्रचंड उन्हामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतकरी प्रचंड कष्ट करूनही त्यांचे धान खरेदी केंद्र (Paddy Buying Centre) वेळेवर सुरू न झाल्यामुळे कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकावे लागते. ज्यामुळे त्यांना क्विंटलमागे 300 ते 400 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
1 मेपासून धान खरेदी अपेक्षित!
दरवर्षी 1 मेपासून उन्हाळी हंगामाची धान खरेदी आणि 1 नोव्हेंबरपासून खरीप हंगामाची धान खरेदी सुरू करणे अपेक्षित आहे. मात्र, यंदा वेळेत केंद्र सुरू न झाल्यान शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे. गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्वरित खरेदी केंद्र सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.पण खरीप हंगामातील (Kharif Season) धानाची भरपाईसाठी उचल न केल्यामुळे केंद्र संचालकांनी (Center Director) अजून पर्यंत धान खरेदीचे ऑनलाईन करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे एकीकडे जिल्ह्यात धान्य खरेदी घोटाळ्याची खमंग चर्चा असताना महामंडळाकडून खरेदी सेंटरवरील खरीप हंगामातील धान पडून असल्याने उन्हाळी धनाची खरेदी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही हे कारण सांगून केंद्र संचालक खरेदीकडे पाठ फिरवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे
- खरीप हंगामातील धनाची उचल न झाल्यामुळे खरेदी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही त्यामुळे यावर्षी उन्हाळी दान खरेदी सुरू करणे जमणार नाही त्यामुळे खरेदी करण्यासाठी ऑनलाईन बंद आहे
बाळकृष्ण मारगाये
व्यवस्थापक आदिवासी विविध कार्य खरेदी संस्था बेतकाठी