मुंबईत केला प्रवेश
परभणी/पाथरी () : परभणी/पाथरी शहरांतील माजी आमदार दुर्राणी यांचे शहरात खंदे समर्थक राहिलेल्या चार माजी नगरसेवकांनी शुक्रवारी मुंबई येथे सईद खान (Saeed Khan) गटामध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या वर्षभरात आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे गटातून यापूर्वी सईद खान (Saeed Khan) यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात जिल्हा परिषद, बाजार समिती, नगरसेवक यांचा समावेश होता. हे पक्ष बदलाचे वारे आणखी शमले नसून शुक्रवार २७ डिसेंबर रोजी माजी आमदार दुर्राणी यांचे चार निकटवर्तीय माजी नगरसेवक लालू खान, एजाज खान, अलोक चौधरी व मुश्ताक अली यांनी सईद खान (Saeed Khan) गटात प्रवेश केला. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर चार माजी नगरसेवकांचा पक्ष बदल राजकीय गणिते बदलणार आहे.