शहरातील विविध भागात राबविली कारवाईची तपासणी मोहीम
जीएसटी विभागाच्या कारवाईमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले
जीएसटी विभागाच्या कारवाईमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले
अकोला (GST Raid) : अकोला शहरातील विविध होलसेल पान मसाला आणि तंबाखू विक्री करणार्या व्यावसायिकांनी वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी कर चुकविल्याचा संशय सदर विभागाला आहे. त्या अनुषंगाने सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील (GST Raid) वस्तू व सेवा कर विभागाच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत असलेल्या अकोला शहराजवळील नवीन किराणा मार्केट, मोहम्मद अली रोड, भाजी बाजार, रिधोरा व अलंकार मार्वेâट येथे छापेमारी केली. यावेळी काही प्रतिष्ठानांची झाडाझडती घेण्यात आली आहे.
मुंबई व छत्रपती संभाजीनगर येथील वस्तू व सेवा कर म्हणजे (GST Raid) जीएसटी विभागाने अकोला शहरातील रिधोरा येथील गोदामाची तपासणी केली. यासोबतच अकोला शहरातील भाजी बाजार, मोहम्मद अली रोड, नवीन किराणा मार्केट, अलंकार मार्केट येथील होलसेल काही पान मसाला व तंबाखू व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांची झाडाझडती घेतली आहे.
या कारवाईमुळे सदर व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. परंतु, सदर कारवाई तपासणी मोहीम ही नियमित असल्याचे सदर विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र, ज्या प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली, त्या व्यावसायिकांनी (GST Raid) वस्तू व सेवा कर चुकविल्याचा सदर विभागाला संशय आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून, यावेळी काही संशयास्पद दस्तऐवजाची तपासणी करण्यात आली आहे. तर मुंबई व छत्रपती संभाजीनगर येथील वस्तू व सेवा कर विभागाच्या पथकाने दिवसभर छापेमार कारवाई करून काही संशयास्पद दस्तऐवज ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
जीएसटी कर चुकविल्याचा यंत्रणेला मोठा संशय!
अकोला शहरातील पान मसाला व तंबाखू विक्री करणार्या होलसेल व्यावसायिकांनी वस्तू व सेवा कर चुकविल्याचा त्यांना संशय असल्याने सोमवारी दिवसभर छापेमार कारवाईची (GST Raid) मोहीम राबविण्यात आली आहे.
या ठिकाणी राबविली कारवाईची मोहीम!
मुंबई व छत्रपती संभाजीनगर येथील (GST Raid) वस्तू व सेवा कर विभागाच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ जवळील रिधोरा गावानजीक असलेल्या एका गोदामाची पाहणी करून तपासणी केली तसेच अकोला शहरातील नवीन किराणा मार्वेâट, मोहम्मद अली रोड, भाजी बाजार व अलंकार मार्वेâट या ठिकाणी छापेमार कारवाईची मोहीम राबविली.