हिंगोली (Minister Narhari Jhirwal) : वसमत तालुक्यातील गुंडा येथे १२ सप्टेंबरला ओढ्याला आलेल्या पुरातून दोन महिला वाहुन गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narhari Jhirwal) यांनी मयत महिलांच्या कुटूंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
गुंडा येथील सखुबाई विश्वनाथ भालेराव, गयाबाई अंबादास सारोळे या दोन महिला ओढ्याला आलेल्या पुरातून वाहुन गेल्या होत्या. त्या निमित्ताने बुधवारी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी गुंडा येथे जाऊन दोन्ही मयत महिलांच्या कुटूंबीयांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तहसीलदार शारदा दळवी, मंडळ अधिकारी शिवानंद झोळगे, तलाठी अमोल इंगळे, नवनाथ निर्मले, रत्नमाला श्रृंगारे आदी उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्ती सानुग्रह अनुदानातून मृतांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यात आल्याचे पालक मंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narhari Jhirwal) यांना प्रशासनाने सांगितले. यावेळी ग्रामस्थांचीही उपस्थिती होती.




