यवतमाळ (Yawatmal) :- प्रेम प्रकरणातून एकाच ठिकाणी काम करत असलेल्या युवकाने एका अल्पवयीन मुलीला पळून यवतमाळमध्ये आणल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यवतमाळ मध्ये रविवारी गुजरात पोलिस (Gujrat Police) दाखल झाले होते.
अल्पवयीन मुलीला व आरोपी रश्मी रंजन शामल याला शहर पोलिस आणले ठाण्यात
१५ वर्ष ६ महिन्याची अल्पवयीन मुलगी रा. गोंदल, जिल्हा राजकोट व मुलगा रश्मी रंजन शामल (२६) रा. भुवनेश्वर हे दोघे एकाच ठिकाणी कामाला होते. त्या ठिकाणीहून दोघेही यवतमाळ येथील भारी विमानतळाच्या जवळ असलेल्या गृहलक्ष्मी टेक्सटाईल्स स्पिनिंग कंपनी मध्ये काम करत होते. आपली अल्पवयीन मुलगी रश्मी रंजन शामल याने पळून नेली असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी गुजरात पोलिसांनकडे केली होती. मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारी वरून गुजरात पोलिसांनी रविवारी यवतमाळ शहर पोलिस ठाणे गाठले व गृहलक्ष्मी टेक्सटाईल्स स्पिनिंग कंपनी मध्ये जाऊन आरोपी रश्मी रंजन शामल व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. यवतमाळ शहर पोलिस स्टेशनच्या पोलीसांच्या मदतीने गुजरात पोलिसांनी ही कारवाई केली. अल्पवयीन मुलीला व आरोपी रश्मी रंजन शामल याला शहर पोलिस ठाण्यात आणले.
पुढील कायदेशीर कारवाई (action) करण्यात साठी गुजरात पोलिसांनी दोघांनाही ताब्यात (possession) घेऊन शहर पोलीस ठाण्याच्या मदतीने गुजरातकडे रवाना झाले . परराज्यातील मुलगी व मुलगा गृहलक्ष्मी टेक्सटाईल्स स्पिनिंग कंपनी मध्ये काम करण्यासाठी आले असतानाच या कंपनीने ते दोघे कुठून आले, त्याचा संबंध काय याची खातरजमा करून न घेताच कामाला ठेवून घेतले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे