हिंगोलीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात घेत होता उपचार
हिंगोली (Hingoli District Hospital) : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात १६ जुलैला एका अनोळखी रुग्णाला अपघात कक्षामध्ये दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांना नाव व गावाची विचारणा केली असता त्याने तुकाराम देवजाळे रा. दत्तरामपूर एवढेच सांगितले. (Hingoli District Hospital) उपचार झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी समाजसेवा अधिक्षक अमोल वाढे यांनी दत्तरामपूर गावाचा शोध घेतला.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दत्तरामपूर हे गाव असल्याचे समजल्यावर त्यांनी आर्णी पोलिस ठाण्यातील कर्मचारी निलेश सुरडकर यांच्याशी संपर्क करून दत्तरामपूर येथे तुकाराम देवजळे नावाची कोणी व्यक्ती आहे का याची विचारणा करून त्यांच्या नातेवाईकांचा संपर्क उपलब्ध करून देण्याची त्यांनी विनंती केली. यावेळी त्यांनी (Hingoli District Hospital) रुग्णाचा फोटोही पाठविला असता दत्तरामपूर येथील दिपक देवतळे यांनी फोटो पाहून त्यांचे ते काका असल्याचे सांगून संपर्क साधला. तुकाराम देवजाळे यांचे लहान बंधू व मुलगा यवतमाळ येथे राहत असल्याचे समजले.
तसेच मुंकूदराव देवजळे यांनी रुग्णाचे नाव तुकाराम नसून चांगदेव देवतळे असे असल्याचे सांगितले. मागील वीस वर्षापासून ते आमच्या संपर्कात नसल्याने त्यांचा शोध घेतला जात होता. परंतु आजपर्यंत आम्हाला ते भेटले नाही, आम्ही त्यांना नेण्यासाठी हिंगोलीला येतो असे सांगितले. त्यावरून २५ जुलै रोजी (Hingoli District Hospital) शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय येथे चांगदेव मुकुंदराव देवतळे यांना त्यांच्या भावासह मुलाच्या स्वाधिन करण्यात आले.
चांगदेव देवतळे यांच्यावर डॉ. भालेराव, डॉ. बोथीकर, कटके, आघाव यांनी उपचार केला. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. चक्रधर मंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, वैद्यकिय अधिक्षक डॉ. दिपक मोरे, अधिसेविका क्षीरसागर, समाजसेवा अधिक्षक रामचंद्र दुधळकर, वैद्यकिय समाजसेवा अधिक्षक संतोष सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली (Hingoli District Hospital) शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाचे समाजसेवा अधिक्षक अमोल वाढे यांनी हि कार्यवाही पार पाडली असून त्यांना समाजसेवा अधिक्षक स्वप्नील दिपके यांनी सहकार्य केले.




