हिंगोली नेत्रदान

नेत्रदान श्रेष्ठदानचा आदर्श, किर्तनकार कुटुंबियांचा स्तुत्य निर्णय

Hingoli Eye Donation: हिंगोलीत, श्रीमती सुमनबाई ओंकारय्या किर्तनकार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. गॅलक्सी सेवाभावी संस्थेने नेत्रदान प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदान श्रेष्ठदानचा आदर्श, किर्तनकार कुटुंबियांचा स्तुत्य निर्णय

Hingoli Eye Donation

हिंगोली (Hingoli Eye Donation) : येथील गंगा नगर भागातील श्रीमती सुमनबाई ओंकारय्या किर्तनकार (वय 80) यांचे दि. 16 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1:30 वाजता दुःखद निधन झाले. या दुःखाच्या प्रसंगीही किर्तनकार कुटुंबियांनी समाजापुढे माणुसकीचा आदर्श ठेवत नेत्रदानाचा (Hingoli Eye Donation) निर्णय घेतला. कुटुंबियांनी तात्काळ गॅलक्सी सेवाभावी संस्था, हिंगोली यांच्याशी संपर्क साधून नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. संस्थेच्या वतीने दुपारी 3:30 वाजता नेत्रदानाची प्रक्रिया पार पडली. डॉ. प्रतिक लखामावार व डॉ. साजेद यांच्या पथकाने ऑपरेशन यशस्वी केले. विशेष सहकार्य डॉ. अगस्ती जवळेकर व डॉ. कैलाश कोटकर यांचे लाभले. 

संकलित नेत्र जालना येथील गणपती नेत्रालयात पाठवण्यात आले असून, त्याद्वारे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळणार आहे. हे संस्थेचे 102 वे नेत्रदान ठरले आहे. (Hingoli Eye Donation) स्व. सुमनबाई यांच्या पश्चात 4 मुले, 1 मुलगी, नातू, नातसुना असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गॅलक्सी सेवाभावी संस्थेचे समन्वयक डॉ. मनिष मुपकलवार यांनी ही माहिती दिली आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026