कोरची ग्रामीण रुग्णालय

कोरची ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच तीन यशस्वी सिझेरियन; दुर्गम भागातील गर्भवतींना मोठा दिलासा

Korachi Gramin Hospitals: अतिदुर्गम कोरची तालुक्यासाठी आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना घडली असून, ग्रामीण रुग्णालय कोरची येथे प्रथमच तीन गर्भवती महिलांवर यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया

कोरची ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच तीन यशस्वी सिझेरियन; दुर्गम भागातील गर्भवतींना मोठा दिलासा

Korachi Gramin Hospitals

कोरची (Korachi Gramin Hospitals) : अतिदुर्गम कोरची तालुक्यासाठी आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना घडली असून, ग्रामीण रुग्णालय कोरची येथे प्रथमच तीन गर्भवती महिलांवर यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या यशस्वी कामगिरीमुळे परिसरातील गर्भवती महिलांना आता प्रसूतीसाठी गडचिरोली किंवा कुरखेडा येथे धाव घेण्याची गरज कमी होणार आहे.
         
यापूर्वी (Korachi Gramin Hospitals) कोरची तालुक्यातील गुंतागुंतीच्या अथवा अतिजोखमीच्या गर्भवती महिलांना सिझेरियन प्रसूतीसाठी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली तसेच उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे तातडीने रेफर करण्यात येत होते. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना वेळ, आर्थिक खर्च आणि प्रवासाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता कोरची ग्रामीण रुग्णालयातच सिझेरियन सुविधा सुरू झाल्याने दुर्गम भागातील महिलांना वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
         
ही शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक (स्त्रीरोगतज्ज्ञ) डॉ. वर्षा लहाडे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार माळकोळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कमलेश पारसवाणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण इरपाते, भूल तज्ञ डॉ समिर बनसोडे तसेच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरीत्या पार पडली.
         
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या शस्त्रक्रियेमध्ये तीन मातांनी सुरक्षितपणे बाळांना जन्म दिला असून माता आणि नवजात बालकांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रुग्णालय वैघकीय अधीक्षक डॉ. कमलेश पारसवाणी यांनी दिली.
         
या (Korachi Gramin Hospitals) यशामागे जिल्हा शल्यचिकित्सक तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांचे मार्गदर्शन आणि पुढाकार महत्त्वाचा ठरला. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियोजन आणि तांत्रिक सहकार्यामुळेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कमलेश पारसवाणी यांनी कोरची येथे सिझेरियन प्रसूती सेवा प्रत्यक्षात सुरू करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविला. दुर्गम भागात अशी सुविधा सुरू करण्यासाठी त्यांनी आवश्यक वैद्यकीय यंत्रणा, मनुष्यबळ आणि समन्वय उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
         
कोरचीसारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. भविष्यातही ही सेवा नियमितपणे सुरू राहावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

संबंधित सामग्री

अमेरिकेचा मोठा निर्णय; भारतातील औषधांवरील अतिरिक्त शुल्क रद्द!

अमेरिकेचा मोठा निर्णय; भारतातील औषधांवरील अतिरिक्त शुल्क रद्द!

Medicines Zero percent duty: अमेरिकेने भारतासह 20 देशांतून आयात होणाऱ्या काही विशेष औषधे आणि त्यांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांवरील ‘अ‍ॅड व्हॅलोरम’ शुल्कातून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 01, 2026
यवतमाळमध्ये कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; घाटंजी तालुक्यात हळहळ

यवतमाळमध्ये कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; घाटंजी तालुक्यात हळहळ

घाटंजीतील चिखलवर्धा येथे कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय अंशचा उपचारादरम्यान मृत्यू. ऑक्सिजन व रुग्णवाहिका उपलब्धतेबाबत नातेवाइकांचे गंभीर आरोप.

Sep 18, 2026
गडचिरोलीत १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू; आरोग्य यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

गडचिरोलीत १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू; आरोग्य यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

गडचिरोलीत अवघ्या १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू झाला आहे. धानोरा तालुक्यातील दिव्या रामसिंग उईके यांचा प्रसूतीदरम्यान बाळासह मृत्यू झाला.

Sep 09, 2026
जिल्हा रुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; डॉक्टर, कर्मचारी व सफाई कामगारांना बांधल्या राख्या

जिल्हा रुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; डॉक्टर, कर्मचारी व सफाई कामगारांना बांधल्या राख्या

Hingoli Hospital Raksha Bandhan: महिला पतंजली योग समिती व लोकसेवा मंडळ रुग्ण मित्र यांच्या संयुक्त सहकार्याने शासकीय जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे बहीण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन

Aug 31, 2026