मानोरा (Heavy Rain Damage) : तालुक्यातील मौजे गव्हा येथील किशोर नामदेव डहाके यांचे दि. १ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे घराची भिंत पडून घरातील संसार उपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
सविस्तर असे की, मौजे गव्हा येथील अल्पभूधारक शेतकरी किशोर डहाके यांचे घराचे बांधकाम वीट मातीने झालेले आहे. सोमवारी रात्री दोन तास पडलेल्या संततधार (Heavy Rain Damage) मुसळधार पावसाने घराची भिंत कोसळल्यान बेघर होण्याची पाळी आलेली आहे. नैसर्गिक आपत्तीने जवळपास दोन लाख रुपयाचे नुकसान झाले असुन घरातील संसार उपयोगी साहित्य सुध्दा ओली झाली आहे.
महसूल विभागाने घर पडझडीच्या नुकसानीचा पंचनामा करून कुटुंबाला शासनाची नैसर्गिक आपत्ती विभागातून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी पिडीत कुटुंबाच्या वतीने करण्यात आली येत आहे.